परिचारिकांना पदोन्नतीचा लाभ द्या- सिरसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 01:36 AM2017-01-05T01:36:41+5:302017-01-05T01:36:41+5:30
आॅक्झलरी नर्स मिडवायफरीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी,
गडचिरोली : आॅक्झलरी नर्स मिडवायफरीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षा माया सिरसाट यांनी केली आहे.
१९८५ ते १९८८ पर्यंत आॅक्झलरी नर्स मिडवायफरी ट्रेनिंग एक वर्षाचे होते. १९८५ पर्यंत ज्यांनी एक वर्षाचे ट्रेनिंग पास करून जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती मिळाली, त्यांना पुन्हा सहा महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केल्याशिवाय १२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती देण्यात येणार नाही, असे शासनाचे म्हणणे होते. त्यानुसार अनेक परिचारिकांनी सहा महिन्याचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात केले. शासनाची वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कालबद्ध पदोन्नती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे नर्सेस संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती दाखल केली. त्यानुसार शासनाने ७ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय घेऊन नर्सेसचे ट्रेनिंग एक वर्षाचे असो वा दीड वर्षाचे असो त्यांना सेवेत रूजू झाल्यापासून १२ वर्ष व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, असे म्हटले आहे.
ज्या नर्सेसकडून वेतनाची वसुली केली आहे, ती शासनाने परत करावी व सरसकट नियुक्ती दिनांकापासून कालबद्ध पदोन्नती लागू करावी. शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती काबरे, कल्पना रामटेके, उईके, मानकर, कुमरे, राळेकर, वनस्कर, सुपारे, यादव, बावणे, राठोड, पांडे, पेशट्टीवार, पेंदाम, पोटावी, निलमवार, सेलोकर, गोगे, कुलसंगे, आसमवार, गजलवार, वासनिक, बावनकर यांच्यासह नर्सेस संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)