अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती लाभ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:50+5:302021-07-24T04:21:50+5:30
याप्रसंगी. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी मार्गदर्शन केले. उज्ज्वला उंदीरवाडे यांनी अंगणवाडीच्या रिक्त जागांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ...
याप्रसंगी. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी मार्गदर्शन केले. उज्ज्वला उंदीरवाडे यांनी अंगणवाडीच्या रिक्त जागांकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांकडे अतिरिक्त कार्यभार दिला जातो. मात्र अतिरिक्त कार्यभाराचा मोबदला दिला जात नाही. मानधनाच्या निम्मा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
ललिता केदार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विठाबाई भट, रंजना चौकुडे, इंदुमती भांडारकर, ललिता दहागावकर, कौसल्या गौरकार, फकीराजी ठेगणे, अमोल मारकवार, मंदा चव्हाण, ज्योती बेजंकीवार, उर्मिला गव्हारे, सुनंदा बावणे, सुशिला कार, कल्पना भाेसले आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
या मागण्यांकडे वेधले लक्ष...
धरणे आंदाेलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या निम्मी पेन्शन मिळालीच पाहिजे, सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, अंगणवाडीच्या रिक्त जागा लवकर भराव्यात, पोषण ट्रॅकरमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याची सक्ती करू नये, दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. असे असताना अमृत आहाराच्या नावाखाली ३० रुपयात जेवण देणे शक्य नाही. तेव्हा प्रति लाभार्थी ५० रुपये देण्यात यावेत, आदी मागण्यांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.