सेविकांना मानधन वाढ द्या

By admin | Published: June 16, 2017 12:53 AM2017-06-16T00:53:11+5:302017-06-16T00:53:11+5:30

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीला महिला व बालकल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

Give the Saviors an increase in honor | सेविकांना मानधन वाढ द्या

सेविकांना मानधन वाढ द्या

Next

चामोर्शीत मेळावा : महिला व बालकल्याण विभागाची संमती
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीला महिला व बालकल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मानधनवाढ तत्काळ लागू करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
चामोर्शी येथे अंगणवाडी सेविकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला फकिरा ढेंगणे, मधुकर भरणे, माया नैैनुरवार, सुमन तोकलवार, सुशिला कार, रजनी चलकलवार, माया शेडमाके, विजय चौधरी, डी. एस. वैद्य, रेखा ढेंगळे, लता अहिरकर आदी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकेला कमीत कमी ७ हजार ५०० रूपये मानधन राहणार आहे. त्यात शिक्षण व अनुभवाची भर पडेल. अंगणवाडी सेविकेच्या मानधनवाढीच्या ७५ प्रतिशत मानधनवाढ मदतनीसांना दिल्या जाईल. अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीऐवढीच वाढ मिनी अंगणवाडी सेविका व मदनीसांना दिली जाणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून मानधनवाढ लागू होईल, अशी शक्यता प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी व्यक्त केली.
अंगणवाडी महिलांच्या मेळाव्याला चामोर्शी तालुक्यातील ५०० पेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाषणादरम्यान चंदा मेंढे यांनी अर्थमंत्रालयाने मानधनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही तर हताश न होता तीव्र लढ्याकरिता सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन केले.

Web Title: Give the Saviors an increase in honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.