वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना द्या

By admin | Published: March 13, 2017 01:28 AM2017-03-13T01:28:51+5:302017-03-13T01:28:51+5:30

विद्यार्थ्यांना संशोधक बनवायचे असेल तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावे.

Give a scientific approach | वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना द्या

वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना द्या

Next

राजे धर्मराव महाविद्यालयात व्याख्यान : राजेश बेझंकीवार यांचे प्रतिपादन
आलापल्ली : विद्यार्थ्यांना संशोधक बनवायचे असेल तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणा संबंधित लहान लहान संशोधन प्रकल्प तयार करून ते विद्यापीठास सादर करावे, लहान संशोधन प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच मोठे वैज्ञानिक तयार होतात, असे प्रतिपादन कॅनडा येथे कार्यरत वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. राजेश बेझंकीवार यांनी केले.
अहेरी येथील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ‘जागतिक पर्यावरणाचे परिणाम व उपाय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. राजेश बेझंकीवार हे राजे धर्मराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांना गोल्ड मेडल मिळाला. याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य विजय खोंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. एस. पी. कुंडू, प्रा. आय. के. येसंबरे, प्रा. टी. एस. मोरे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. रमेश हलामी तर आभार पल्लवी दहागावरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुधाकर पाले, शंकर जामपल्लीवार यांनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Give a scientific approach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.