एटापल्लीला विशेष निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:39 PM2017-10-05T23:39:56+5:302017-10-05T23:40:30+5:30

नगर पंचायत क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली.

Give special funds to Atapalli | एटापल्लीला विशेष निधी द्या

एटापल्लीला विशेष निधी द्या

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी दिली भेट : विकासकामांसाठी पदाधिकाºयांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : नगर पंचायत क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे गुरूवारी निवेदनाद्वारे केली.
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गुरूवारी नगर पंचायतीला भेट दिली असता, त्यांना पदाधिकाºयांनी निवेदन सादर केले. भेटीदरम्यान नगर पंचायतीच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगर पंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी उपलब्ध करावे, एटापल्ली येथील वन विभाग तपासणी नाका ते विश्रामगृह या मुख्य रस्त्यावर दुभाजक तयार करण्याकरिता पाच कोटी द्यावे, एटापल्लीतील अंतर्गत रस्ते दुरूस्तीसाठी तसेच मरपल्ली, वासामुंडी, कृष्णार यांना जोडणाºया रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २० कोटी उपलब्ध करावे, नगर पंचायत अंतर्गत सर्व गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकरिता पाच कोटी तसेच एटापल्लीत हायमॉस्ट लाईटकरिता पाच कोटी, नगर पंचायत अंतर्गत गावात एकूण १३ हायमॉस्टकरिता एकूण ३० लाखाचा निधी उपलब्ध करावा. आलदंडी नदीघाटावरून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, येथे खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर सुरू करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी नगर पंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच आचारसंहिता असल्याने भूमिपूजनाचे काम करता येणार नाही. परंतु भूमिपुजनाची वाट न बघता कामे सुरू करावी, असे आदेश देत सदर कामांचे लोकार्पण करण्यास आपण उपस्थित राहू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान त्यांनी रूग्णालयाला भेट दिली.
याप्रसंगी नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, मुख्याधिकारी एम. एन. सिलमवार, उपाध्यक्ष रमेश गंपावार, बांधकाम सभापती किसन हिचामी, नगरसेवक तानाजी दुर्वा, दीपक सोनटक्के, ज्ञानेश्वर रामटेके, योगेश्वर नल्लावार, रेखा मोहुर्ले, पं. स. सदस्य जनार्दन नल्लावार उपस्थित होते.

Web Title: Give special funds to Atapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.