सत्यपाल महाराजांना ‘झेड’ सुरक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 12:50 AM2017-06-06T00:50:33+5:302017-06-06T00:50:33+5:30
राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना ‘झेड’ द्यावी, ...
मुख्यमंत्र्यांकडे मागणी : काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना ‘झेड’ द्यावी, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार व राष्ट्रसंतांच्या विचारांचे जेष्ठ प्रचारक तथा अंधश्रद्धेविरोधात समाज जागृती करणारे सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर उर्फ सत्यपाल महाराज यांचा कार्यक्रम नायगाव, मुंबई येथे १२ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. प्रबोधन कार्यक्रम सुरू असताना कुणाल जाधव नामक युवकाने सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या सर्व लोकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. सत्यपाल महाराजांना शासनाच्या वतीने ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महासचिव प्रभाकर वासेकर, पी. टी. मसराम, रजनीकांत मोटघरे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, अपर्णा खेवले, आशा मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.