माना समाजाबाबात शासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:16 PM2018-12-17T22:16:42+5:302018-12-17T22:17:05+5:30

माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, तसेच गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी शासन सकारात्मक आहे. काही तांत्रिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाले आहेत, असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी केले.

Given the positive attitude of the society | माना समाजाबाबात शासन सकारात्मक

माना समाजाबाबात शासन सकारात्मक

Next
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : कढोली येथे वीरांगणा मुक्ताई महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे, तसेच गोवारी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, यासाठी शासन सकारात्मक आहे. काही तांत्रिक बाबींमुळे अडचणी निर्माण झाले आहेत, असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे विरांगणा मुक्ताई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भाग्यवान टेकाम होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य वर्षा कोकोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पी.आर.आकरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, वामन सावसाकडे, शत्रुघ्न चौधरी, डॉ.दुर्गादास आकरे, विजय नाकाडे, सुरेश रणदिवे, पुरूषोत्तम दडमल, पत्रूजी घोडमारे, गोविंदा नारनवरे, प्रकाश नारनवरे, अनिल कोटांगले, नितेश दडमल, सरपंच चंद्रकांत चौके, प्रा.प्रदीप बोडणे, फाल्गुन चौके, प्रकाश रणदये, अशोक घरत, योगराज जनबंधू आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.कृष्णा गजबे म्हणाले, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास करण्यासाठी विद्यमान भाजपा शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजना पोहोचाव्या, यासाठी विविध माध्यमातून शासन प्रयत्नरत आहे. गडचिरोली जिल्ह्याला केंद्र व राज्य शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्हाभरात विकास कामांना गती आली आहे, असे प्रतिपादन आ.कृष्णा गजबे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुणवंत दडमल, संचालन सुधाकर चौधरी, आभार पुरून चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी पंढरी रणदिवे, नामदेव नारनवरे, सुरेश नारनवरे, कालिदास नारनवरे, फुक्कट मरगळे, हिराजी चौके, केवळ मरगळे यांच्यासह माना समाजातील युवकांनी सहकार्य केले.

Web Title: Given the positive attitude of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.