हृदयातील पाणी काढून रुग्णाला जीवनदान; जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच पार पडली प्रक्रिया

By दिगांबर जवादे | Published: January 11, 2024 05:29 PM2024-01-11T17:29:11+5:302024-01-11T17:30:03+5:30

जिल्हा रुग्णालयात ही प्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली.

Giving life to the patient by draining the water from the heart procedure was performed for the first time in Gadchireli District Hospital | हृदयातील पाणी काढून रुग्णाला जीवनदान; जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच पार पडली प्रक्रिया

हृदयातील पाणी काढून रुग्णाला जीवनदान; जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच पार पडली प्रक्रिया

दिगांबर जवादे, गडचिरोली : ब्रह्मपुरी तालुक्यातील चिखलगाव येथील सूरज महादेव राऊत (१७) हा जिल्हा सामान्य रुग्णालयात छातीवर सुजन, श्वास घ्यायला त्रास, पोट फुगलेला, दोन्ही पायांवर सुजन अशा गंभीर लक्षणांसह भरती झाला. त्याच्या हृदयाच्या आवरणात संपूर्ण पाणी जमा झाल्याचे ‘पेरिकार्डीयल इफ्युजन’ निदान करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर पेरिकार्डियल सेंटेसिस हे उपचार करून हृदयातील पाणी बाहेर काढण्यात आले. त्यामुळे रूणाचे प्राण वाचले. जिल्हा रुग्णालयात ही प्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली.

गडचिरेाली जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ नसल्याने हृदयाशी संबंधी सर्व रुग्णांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे पाठविले जाते. मात्र डॉ. आशिष खुणे हे फिजिशियन असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच पेरिकार्डियल सेंटेसिस ही प्रक्रिया करून सूरजच्या हृदय आवरणातील २००० मिली पाणी काढले. पाणी हळू हळू कमी होताच हृदयाची हालचाल सामान्य व्हायला लागली.

यावेळी आशिष खुणे यांच्यासह वरिष्ठ भिषक डॉ. मनीष मेश्राम, अधिपरिचारिका किरण मोक्कदम, दिव्या शयामकुवर, गजानन गेडाम उपस्थित हाेते. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी आभार व्यक्त करत समाधान मानले.

टीबी, व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन, हायपोथायरॉयडीसम कॅन्सर, हार्ट फेल, किडनीचे जुने आजार, ऑटो इम्युनोडीसिज, यात हृदयाच्या सभोवती पाणी जमा होऊ लागते आणि जर हे वाढत गेले तर हृदयावर दाब वाढून हृदयाची हालचाल मंदावते. ज्याला तात्काळ पेरिकार्डियो सेंटेसिस ही प्रक्रिया करून पाणी काढावे लागते. ज्याने प्रेशर कमी होऊन रुग्ण बचावताे - डॉ. आशिष खुणे, फिजिशियन, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली.

Web Title: Giving life to the patient by draining the water from the heart procedure was performed for the first time in Gadchireli District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.