उत्कृष्ट कार्य करणाºया आशांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:53 AM2017-12-02T00:53:19+5:302017-12-02T00:53:32+5:30
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने कार्यालयात आशा दिवसानिमित्त वडसा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देसाईगंजच्या वतीने कार्यालयात आशा दिवसानिमित्त वडसा तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी नेत्र, रक्तदाब, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच मागील सहा महिन्यांच्या कालावधीत ज्या आशा स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्रात माता व नवजात बालकांचा मृत्यू झालेला नाही, अशा आशांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय कोसे, लेखापाल चंद्रकांत मेश्राम, कविता आठवले आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रणय कोसे यांनी नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याबाबतची माहिती आशा स्वयंसेविकांना दिली. नवजात बालकांना होणाºया निमोनिया, जंतूसंसर्ग, हायपोथर्मिया, संक्रमण, स्तनपान आदी समस्या तसेच कमी वजनाचे कमी दिवसाचे बालके आदींची काळजी व औषधोपचार कसा घेतला पाहिजे, याबाबतची माहिती डॉ. कोसे यांनी दिली.
आशा दिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा, कविता वाचन, लेखन व सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.