नृत्यातून आदिवासी संस्कृतीची झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:23 PM2018-11-26T22:23:09+5:302018-11-26T22:23:23+5:30

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संघांनी आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

A glimpse of tribal culture from dance | नृत्यातून आदिवासी संस्कृतीची झलक

नृत्यातून आदिवासी संस्कृतीची झलक

googlenewsNext
ठळक मुद्देगडचिरोलीत स्पर्धा : एसडीपीओ कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीतर्फे २६ नोव्हेंबर रोजी आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संघांनी आदिवासी संस्कृतीची झलक दाखविणारे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच आदिवासींच्या कलाप्रिय संस्कृतीचा परिचय नृत्यातून दिला.
जिल्ह्यातील युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे. आदिवासींची सधन संस्कृती नागरिकांना कळावी, या उद्देशाने पोलीस दलाने जिल्हाभरातील पोलीस स्टेशनमध्ये आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पोलीस स्टेशनमधून विजेते पद प्राप्त करणाऱ्या संघांना उपविभागीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात आदिवासी नृत्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत उपविभागातील सहा संघांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत पोलीस स्टेशन चामोर्शीच्या वायरल ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. पोलीस मदत केंद्र घोटच्या अनुप रेला नृत्य संघाने द्वितीय तर आयटीआय गडचिरोली संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. प्रथम पुरस्कार सात हजार, द्वितीय पाच हजार व तृतीय पारितोषीक तीन हजार रूपये सोबत ट्रॉफी देऊन विजेत्या संघांना गौरविण्यात आले. तसेच सहभागी संघांना प्रशस्तीपत्र सुध्दा देण्यात आले. प्रथम आलेल्या संघाला जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एसडीपीओ विशाल ढुमे, पं.स. सदस्य इचोडकर, सुधा सेता यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण करण्यात आले.

Web Title: A glimpse of tribal culture from dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.