उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, घरकुल लाभार्थ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:42 AM2021-08-20T04:42:53+5:302021-08-20T04:42:53+5:30

राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या ...

Glory to the Gram Panchayat, Gharkul beneficiaries who have done an excellent job | उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, घरकुल लाभार्थ्यांचा गौरव

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, घरकुल लाभार्थ्यांचा गौरव

Next

राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्यपुरस्कृत आवास योजना, ग्रामीण अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून उत्कृष्ट घरकुल बांधकाम केल्याबद्दल लाभार्थ्यांचा तसेच सर्वाेत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदारांनी ग्रामपंचायतींचे कौतुक करून यापुढे असेच उत्तम कार्य करून गावाचा नावलौकिक करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती नीता ढोरे, संवर्ग विकास अधिकारी चेतन हिवंज, शाखा अभियंता के. आर. सलामे, ए. के. मेश्राम, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रियंका घोळवे, मयूरी मने, चेतक सलाम व अखिल वैरकार उपस्थित हाेते. गटशिक्षणाधिकारी एन. डी. कोकुडे यांनी संचालन केले; तर विस्तार अधिकारी (पंचायत) आर. टी. पारधी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच व लाभार्थी उपस्थित होते.

बॉक्स

या ग्रामपंचायतींचा झाला गौरव

उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून चुरमुरा (प्रथम क्रमांक), सुकाळा (द्वितीय क्रमांक), मोहझरी (तृतीय क्रमांक) तसेच राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ग्रामपंचायत सुकाळा (प्रथम क्रमांक), इंजेवारी (द्वितीय क्रमांक) व पळसगाव (तृतीय क्रमांक), आदींचा सन्मान झाला. सदर ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव तसेच उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पंचायत समितीचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता राकेश चलाख यांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Web Title: Glory to the Gram Panchayat, Gharkul beneficiaries who have done an excellent job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.