३५ युवकांना शेळी पालनाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:42+5:302020-12-25T04:28:42+5:30
गडचिराेली : बॅंक ऑफ इंडियाद्वारा संचालित स्टार स्वयंराेजगार प्रशिक्षण संस्था गडचिराेलीच्या वतीने जिल्ह्यातील ३५ युवकांना १० दिवस शेळीपालन प्रशिक्षण ...
गडचिराेली : बॅंक ऑफ इंडियाद्वारा संचालित स्टार स्वयंराेजगार प्रशिक्षण संस्था गडचिराेलीच्या वतीने जिल्ह्यातील ३५ युवकांना १० दिवस शेळीपालन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामुळे बेराेजगार युवकांना राेजगार उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समाराेपीय कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.सुरेश कुंभरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक संदीप कऱ्हाळे, ज्ञानेश्वर ताथाेड, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.अरविंद कसबे, आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम आदी उपस्थित हाेते. डाॅ.सुरेश कुमरे यांनी मार्गदर्शन करताना काेणताही उद्याेग व व्यवसाय उभारणीसाठी जाेखीम उचलणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याशिवाय व्यवसाय उभा राहू शकत नाही. व्यवसाय करताना अनेक चढ-उतार येतात. या चढ-उतारांना डगमगून न जाता व्यवसायाप्रती सकारात्मक भूमिका ठेवून प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.अरविंद कसबे, डाॅ.मुकेश कापगते, डाॅ.विक्रम कदम, डाॅ.नीलेश खलाटे, डाॅ.नरेश आलाम, उपविभागीय कृषी अधिकारी कदम, नाबार्डाचे महाप्रबंधक राजेंद्र चाैधरी, संचालक चेतन वैद्य यांनी मार्गदर्शन केले. समाराेपीय कार्यक्रमाचे संचालन संदीप नेवारे, आभार नीरज भांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय गंडाटे, माेरेश्वर चाैधरी यांनी सहकार्य केले.