गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:58 AM2017-10-14T00:58:17+5:302017-10-14T00:58:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.

On the Godavari Bridge, the traffic of the sand has increased through the truck | गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

googlenewsNext
ठळक मुद्देट्रकांच्या रांगेने वाहतुकीस अडथळा : पुलास धोका होण्याची शक्यता; प्रशासकीय अधिकारी सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दरम्यान रेती भरलेल्या ट्रकांची गोदावरी नदीच्या पुलावर लांबच्या लांब रांग राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी या पुलास धोका होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचा कानाडोळा आहे.
वर्षभरापूर्वी गोदावरी नदीच्या पुलाचे रितसर उद्घाटन झाले होते. सदर पूल निर्मितीमुळे दोन राज्याचा संपर्क थेट वाढणार असून महाराष्टÑ व तेलंगणा राज्यातील जनतेचे आवागमन सुलभरित्या होईल, लोकांचा प्रवास सुखकर होईल, असे वाटले होते. मात्र आता पूल निर्मितीनंतर सदर मार्ग रेती वाहतुकदारांसाठीच निर्माण करण्यात आला काय, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. रेती भरलेल्या ट्रकच्या अपघातात दोन ते तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला. छोटमोटे अपघात सुरूच आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेती घाटावरून तेलंगणा राज्यात रेती नेण्यासाठी ट्रकांचे आवागमन दिवसरात्र सुरू आहे. ट्रकांचे वजन करण्यासाठी रेतीघाटावर व्यवस्था आहे. महाराष्टÑाच्या हद्दीतील ट्रकांमध्ये किती रेती भरलेली आहे, याचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. वनजकाटा सुद्धा आंध्रप्रदेशाच्या हद्दीत आहे. रेतीने भरलेले ट्रकाचा वजनकाटा गोदावरी नदीच्या पुलाच्या पलिकडे आहे. येथे मोजमाप केल्यानंतर ट्रक पुढे मार्गक्रमण करतात. रेतीघाटावर ट्रक चालकांना रेतीची टिपी दिली जाते. तेलंगणात या ट्रकाचे वजन केले जाते. जास्त रेती असल्यास उर्वरित रेती रस्त्याच्या कडेला उतरविली जाते. त्यामुळे गोदावरी नदीच्या पुलावर १०० ट्रकांची रांग पाहावयास मिळते. मात्र गोदावरी नदीचा पूल एवढ्या मोठ्या प्रमाणातील वजन पेलू शकतो की नाही, याबाबत स्पष्टता नाही. भविष्यात सदर पूल कोसळण्याची घटना घडल्यास या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र यासंदर्भात कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला सोयरसुतक नाही. बांधकाम व महसूल विभाग हेतुपुरस्सर या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रेतीची वाहतूक करणाºया ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यातल्या त्यात अपघाताची शक्यता अधिक असते. अशाप्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस विभागही सुस्त असल्याचे दिसून येत आहे. एकंदरित सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यात रेती वाहतुकीचे हे भयावह चित्र असतानाही अधिकाºयांचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. सदर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाºयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सिरोंचा तालुकावासियांनी केली आहे.

Web Title: On the Godavari Bridge, the traffic of the sand has increased through the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.