जनगणनेत गोंडीधर्माची नोंद करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:59+5:302021-02-16T04:36:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुरखेडा : गोंडीधर्माची स्थापना पहांदि पारि कुपार लिंगोने केली असून, अनादी काळापासून या धर्माचे पालन होत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : गोंडीधर्माची स्थापना पहांदि पारि कुपार लिंगोने केली असून, अनादी काळापासून या धर्माचे पालन होत आहे. गोंडीधर्म निसर्गाच्या तत्त्वाशी जुळलेले आहे, त्यामुळे गोंडीधर्माचे बांधव ज्या ज्या भागात वास्तव्यास आहेत. त्या भागातील जल, जंगल व जमिन सुरक्षित आहे. आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरिता होऊ घातलेल्या शासकीय जनगणनेतील धर्माच्या रकान्यामध्ये गोंडीधर्माची नोंद करावी, असे आवाहन आदिवासी अभ्यासक रमेश कोरचा यांनी केले.
कुरखेडा तालुक्याच्या सावलखेडा येथे जय गोंडवाना बहुउद्देशीय गोटूल समितीच्या वतीने कोया पुनेम संमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक नंदू नरोटे यांचा हस्ते करण्यात आले. कोया पुनेम ध्वजारोहण गोंडीधर्म प्रचारक संदीप वरखडे व जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम यांच्या हस्ते पार पाडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक ग्रामसभेचे अध्यक्ष माेहन पुराम, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डाॅ. प्रकाश वट्टी, गोंडी साहित्यिक नंदकिशोर नैताम, घनश्याम मडावी, भगवान मडावी, रामचंद्र कांटेगे, विजय राठीपिठानी, अरुण कन्नाके, योगराज जनबंधू, गुणवंत टेकाम आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी गावातून रॅली काढून, वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याला मालार्पन करण्यात आले तसेच कोया पुनेम ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन लालाजी मडावी, प्रास्ताविक श्रीकांत मडावी, तर आभार यशोधन मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सुधीर गेडाम, राजू तोरे, सुखदेव मडावी, जितेंद्र कुमरे, श्रीधर मडावी, विजय कुमरे, देवानंद गेडाम, पुरुषोत्तम कुमरे, रामदास कुमरे, कालिदास मडावी आदींनी सहकार्य केले.