गोंडवाना हर्बकडे अन्न व औषध विभागाचेही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 02:35 AM2017-05-29T02:35:14+5:302017-05-29T02:35:14+5:30

गडचिरोली येथील गोंडवाना हर्ब हा औषध निर्मिती प्रकल्प अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगी शिवायच

Gondwana Herb also ignores the Department of Food and Drugs | गोंडवाना हर्बकडे अन्न व औषध विभागाचेही दुर्लक्ष

गोंडवाना हर्बकडे अन्न व औषध विभागाचेही दुर्लक्ष

googlenewsNext

चौकशीची मागणी : दोन वर्षांपासून खुलेआम विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील गोंडवाना हर्ब हा औषध निर्मिती प्रकल्प अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगी शिवायच मागील दोन वर्षांपासून चालविला जात होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून खुलेआम औषधांची विक्री होत असतानाही दोन वर्ष अन्न व औषध प्रशसान विभागाने कशी काय डोळेझाक केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोंडवाना हर्ब येथे वनौषधी पॅकींग करून तिची विक्री केली जात होती. बहुतांश औषधी पोटात घ्यायची असल्याने या प्रकल्पाला अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. लाखो रूपये खर्चून प्रकल्पासाठी यंत्र सामग्री खरेदी करण्यात आली. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेतली नाही. त्यामुळे या विभागाच्या देखरेखीशिवाय औषधांची विक्री केली जात होती. हे स्पष्ट होत आहे. मागील दोन वर्षांपासून अन्न व औषध प्रशासन विभागही डोळे झाकून होता, हे दिसून येत आहे. वन विभागाचे अधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्यामध्ये साटेलोटे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Gondwana Herb also ignores the Department of Food and Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.