गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:17+5:302021-06-16T04:48:17+5:30

शिवसेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर्स वाटप केले जात आहे. त्यासाठी सामंत सोमवारी गडचिरोलीत आले होते. ...

Gondwana University sub-center at Chandrapur | गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात

गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात

googlenewsNext

शिवसेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांसाठी व्हेंटिलेटर्स वाटप केले जात आहे. त्यासाठी सामंत सोमवारी गडचिरोलीत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात त्यांनी हे व्हेंटिलेटर्स जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी सीईओ कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, सहायक जिल्हाधिकारी तथा एसडीओ आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भातील कोरोना संसर्ग यशस्वीरीत्या रोखण्यासाठी प्रशासनाने चांगले कार्य केले आहे. गडचिरोली जिल्हाही यामध्ये आघाडीवर असून, जिल्हाधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण स्तरावरील सर्वच यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केले आहे, असे सामंत म्हणाले. येत्या काळातही कोरोनाशी लढायचे आहे, त्यासाठी तयारी व उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत, असे ते म्हणाले.

(बॉक्स)

३८ लाख खर्चूनही कुलगुरू मिळाले नाही

गेल्या नऊ महिन्यांपासून गोंडवाना विद्यापीठाला कुलगुरू नाही. पहिल्या वेळी राजभवनाच्या आदेशानुसार कुलगुरू निवडीची प्रक्रिया पार पडली. पण राज्यपालांनी निवडलेली व्यक्ती रुजूच झाली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा ही प्रक्रिया करावी लागत आहे. यावर आतापर्यंत ३८ लाख रुपये खर्च झाले तरीही विद्यापीठाला कुलगुरू मिळाले नसल्याबद्दल सामंत यांनी खंत व्यक्त केली. राज्यपालांनी डॉ. शर्मा यांची निवड कशी केली, त्यांची इच्छा होती किंवा नाही, ते का रुजू झाले नाही याबद्दल आपण अनभिज्ञ असून, ही बाब आपल्या अखत्यारीतील नसल्याचे ते म्हणाले.

(बॉक्स)

जागा मिळाल्यानंतर विद्यापीठाला विशेष दर्जा

मंत्री सामंत यांनी आधी गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन झालेल्या व प्रलंबित कामांचा आढावा घेतला. त्याबद्दल पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, विद्यापीठासाठी आवश्यक जागा घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून, हे काम झाल्यानंतर विद्यापीठाला खऱ्या अर्थाने फॉरेस्ट आणि ट्रायबल विद्यापीठ म्हणून विशेष दर्जा मिळणार आहे. विद्यापीठासाठी जनसंपर्क अधिकारी हे प्रलंबित पद तात्पुरते भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याबरोबर आरोग्य अधिकारी, कायदे विषयक तज्ज्ञाचीही पदे तात्पुरती भरण्यात येणार आहेत. विद्यापीठांतर्गत इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

(बॉक्स)

चार व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द

उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटरची गरज पूर्ण करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरपैकी चार व्हेंटिलेटर गडचिरोली जिल्ह्यासाठी देण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधा मिळेल, असे सामंत म्हणाले. हे व्हेंटिलेटर लवकरात लवकर सुरू करून आरोग्यसेवेत दाखल करावेत, अशी सूचना त्यांनी प्रशासनाला दिली.

Web Title: Gondwana University sub-center at Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.