मुनघाटे महाविद्यालयाच्या वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:43 AM2021-09-24T04:43:02+5:302021-09-24T04:43:02+5:30
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या लेखनकलेला वाव मिळावा, उत्तम व प्रतिभासंपन्न लेखक, कवी व साहित्यिक घडण्याकरिता मृद्गंध हा वार्षिकांक एक मोठी ...
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या लेखनकलेला वाव मिळावा, उत्तम व प्रतिभासंपन्न लेखक, कवी व साहित्यिक घडण्याकरिता मृद्गंध हा वार्षिकांक एक मोठी संधी ठरत आहे. मृद्गंध या वार्षिककात कोरोना महामारीच्या भयाण वास्तवाशी संबंधी शिक्षणावरील तसेच सामाजिक, आर्थिक व रोजगार यासंबंधी झालेले बदल व त्याचे चांगले, वाईट परिणाम तसेच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय घडामोडी व ठळक घटनांची दखल तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत उत्तम असे वैचारिक लेख, कविता इत्यादींचा अंतर्भाव केलेल्या असून त्याला साजेसे असे सुंदर व सुबक फोटो महाविद्यालयातील घडामोडी व विविध विभागांचे फोटो समाविष्ट केले आहे.
सदर अंक हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या कुशल मार्गदर्शनात मुख्य संपादक डॉ. दशरथ आदे, सहसंपादक डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा .भास्कर तुपटे, डॉ. गुणवंत वडपल्लीवार, आशिष बगमारे, दिव्या दोकरमारे, प्रगती मेश्राम यांनी संपादित केलेले आहे.
230921\img-20210923-wa0047.jpg
फोटो मृदगंध वार्षिकांक मूनघाटे महाविद्यालय कूरखेडा