गोंडवाना विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: November 13, 2014 11:02 PM2014-11-13T23:02:15+5:302014-11-13T23:02:15+5:30
गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसह अभियांत्रिकी,
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षेला ३ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसह अभियांत्रिकी, कायदा शाखेतील पुनर्परीक्षार्थ्यांचीही परीक्षा सुरू झाली आहे.
कला विभागातील पदवीच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. सदर परीक्षा २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. कला विभागातील पदवीच्या चवथ्या सेमिस्टरमधील पुनर्परीक्षार्थ्यांची परीक्षा ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. कला पदव्युत्तर इंग्रजी विभागातील प्रथम वर्षाची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत घेतली जात आहे. कला पदव्युत्तर इंग्रजी प्रथम वर्षाची सेमिस्टर दोनची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. कला पदव्युत्तर हिंदी द्वितीय सत्राची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर, कला पदव्युत्तर हिंदी द्वितीय वर्षाच्या चवथ्या सेमिस्टरची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत, पदव्युत्तर मराठी विभाग प्रथम वर्ष सेमिस्टर द्वितीयची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. पदव्युत्तर द्वितीय वर्ष सेमिस्टर चारची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सुरू आहे. पदव्युत्तर प्रथम वर्ष पाली व प्राकृत सेमिस्टर द्वितीयची परीक्षा १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत तर पदव्युत्तर द्वितीय वर्ष पाली व प्राकृत सेमिस्टर चारची परीक्षा ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत घेतली जात आहे.
कला शाखेतील नियमित विद्यार्थ्यांची पदवीच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २४ नोव्हेंबर २०१४ ते ६ जानेवारी २०१५ या कालावधीत तर बी.ए. द्वितीय वर्षाच्या तृतीय सेमिस्टरची परीक्षा २५ नोव्हेंबर २०१४ ते ७ जानेवारी २०१५, बी. ए. तृतीय वर्ष सेमिस्टर पाचची हिवाळी परीक्षा २६ नोव्हेंबर २०१४ ते ६ जानेवारी २०१५ या कालावधीत घेतली जाणार आहे. एम.ए. प्रथम वर्ष इंग्रजी विषयाची पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४ या कालावधीत एम.ए. इंग्रजी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीय वर्षाची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत एम.ए. हिंदी प्रथम वर्ष पहिल्या सेमिस्टरची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम.ए. हिंदी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीयची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, एम. ए. मराठी प्रथम वर्ष सेमिस्टर एकची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम.ए. मराठी द्वितीय वर्ष सेमिस्टर तृतीयची परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत, एम.ए. पाली प्राकृत प्रथम वर्ष सेमिस्टर १ ची परीक्षा २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर, एम. ए. द्वितीय वर्ष पाली प्राकृत सेमिस्टर तृतीयची हिवाळी परीक्षा २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१४ या कालावधीत घेतली जाणार आहे.
कला शाखेव्यतिरिक्त वाणिज्य शिक्षण, गृह विज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान, सामाजिकशास्त्र, कायदा, मेडिसीन, एम. टेक आदी शाखांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ सेमिस्टरची हिवाळी परीक्षा सुरू झाली आहे. (शहर प्रतिनिधी)