संपामुळे गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज झाले ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:56 PM2019-06-29T21:56:22+5:302019-06-29T21:56:34+5:30
सुधारीत वेतन संरचनेनुसार सातवा वेतन आयोग, एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदीसह विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सुधारीत वेतन संरचनेनुसार सातवा वेतन आयोग, एकस्तर पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, आदीसह विविध मागण्यांसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे ३ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे. दरम्यान कर्मचाºयांनी २९ जून रोजी शनिवारला एक दिवसीय संप पुकारून आंदोलन केले. या आंदोलनामुळे गोंडवाना विद्यापीठाचे कामकाज ढेपाळले.
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाºयांच्या आंदोलनाचे पाच टप्पे पार पडले असून पहिल्या टप्प्यात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, संचालक, सहसंचालक, सचिव यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे. दुसºया टप्प्यात कर्मचाºयांनी तीन दिवस काळ्या फिती लावून कामकाज केले. तिसºया टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. चवथ्या टप्प्यात सामुहिक रजा घेऊन विद्यापीठाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. पाचव्या टप्प्यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. आता २९ जून रोजी एक दिवशीय राज्यव्यापी संप करण्यात आला.
या संपादरम्यान सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात विद्यापीठ कर्मचारी, प्राध्यापक व विद्यार्थी मिळून एकूण २१ जणांनी रक्तदान केले. डॉ. पंजाबराव देशमुख राष्टÑीय शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, शिक्षक हक्क आश्रम संघटनेचे प्रा. संतोष सुरडकर यांनी आंदोलनास भेट देऊन पाठींबा जाहीर केला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. चंद्रशेखर भुसारी व कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी आंदोलन स्थळी येऊन कर्मचाºयांशी चर्चा केली. प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. कर्मचाºयांना न्याय न दिल्यास गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने १५ जुलैपासून कर्मचाºयांचा बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.