खुशखबर ! जुने जन्म-मृत्यू रेकाॅर्ड आता मिळणार ग्रामपंचायतींमधून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2022 10:04 PM2022-03-04T22:04:15+5:302022-03-04T22:05:09+5:30

पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.  

Good news! Old birth and death records will now be available from Gram Panchayats! | खुशखबर ! जुने जन्म-मृत्यू रेकाॅर्ड आता मिळणार ग्रामपंचायतींमधून !

खुशखबर ! जुने जन्म-मृत्यू रेकाॅर्ड आता मिळणार ग्रामपंचायतींमधून !

Next

दिलीप फुलबांधे
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा :  अनेक वर्षांपासूनचे जुने जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड पंचायत समितीकडे असल्यामुळे गावातून तालुक्यात येऊन दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत होती. आता पंचायत समितीने सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतींना पाठविण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ग्रामपंचायतींमधून दाखले मिळणार आहेत. या निर्णयाचे तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जुने जन्म - मृत्यू रेकॉर्ड पंचायत समितीकडे जमा करण्यात आले होते. सावली तालुक्यातील नागरिकांना जुने जन्म - मृत्यू दाखले काढायचे असल्यास सावली येथील पंचायत समिती कार्यालयात यावे लागते होते. आठवड्यातून दोन दिवस दाखले देण्याचे ठरले होते, मात्र त्या दिवशी अचानक  अधिकारी बैठकीसाठी किंवा कामासाठी गेल्यास नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत होते. अनेकदा रेकॉर्ड नसल्यास दाखले उपलब्ध नसल्याचा दाखला घेऊन परत जावे लागत असे.
नागरिकांना पायपीट करावी लागत असे.  ही बाब पंचायत समिती पदाधिकारी यांच्या लक्षात आली. त्यांनी मासिक सभेत जन्म-मृत्यू रेकॉर्ड ग्रामपंचायतींना परत करण्याचा ठराव घेतला. हा ठराव रवींद्र बोलीवार यांनी मांडला व सर्वानुमते सभापती विजय कोरेवार, सदस्य तुकाराम ठिकरे, गणपत कोठारे, छाया शेंडे, मनिषा जवादे, ऊर्मिला तरारे, संगीता चौधरी यांनी ठरावाला मान्यता दिली. गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींना रेकॉर्ड परत केले.

नागरिकांची पायपीट थांबली
पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.   या निर्णयासाठी बिडीओ मरस्कोल्हे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन दाखले घ्यावेत.                 
-विजय कोरेवार,  सभापती, सावली

 

Web Title: Good news! Old birth and death records will now be available from Gram Panchayats!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.