गोपीनाथ मुंडे तमाम बहुजनांचे नेते
By admin | Published: June 4, 2017 12:41 AM2017-06-04T00:41:34+5:302017-06-04T00:41:34+5:30
गोपीनाथ मुंडे यांचे दिशादर्शक विचार व आचार हे वंजारी समाजाला सातत्याने प्रेरणादायी राहतील.
चंद्रशेखर भडांगे यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत वंजारी समाजातर्फे आदरांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोपीनाथ मुंडे यांचे दिशादर्शक विचार व आचार हे वंजारी समाजाला सातत्याने प्रेरणादायी राहतील. गोपीनाथ मुंडे हे केवळ वंजारी समाजापुरते मर्यादित नव्हते, तर देशातील सर्व समाजाचे ते हितचिंतक होते. समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन वाहून टाकणारे ते बहुजनांचे नेते होते, असे प्रतिपादन वंजारी समाज संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त वंजारी समाज सेवा परिषद गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. याप्रसंगी कार्यक्रमाला अॅड. विजय गोरे, प्रकाश ताकसांडे, मिलिंद घरोटे, हेमंत जंबेवार, हरीहर कापकर, रामकिरीत यादव, माजी नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक (यादव), प्रमोद धाईत, रमेश धाईत, रमेश हेमके, श्याम वैद्य, दिलीप आखाडे, माणिक चांगले, अर्चना चांगले, सुभाष हेमके, भाऊराव धाईत, सिंधू हेमके, रसीका साळवे, सुभाष धाईत, विजय साळवे, सतीश धाईत, राजू आखाडे, निखील गोरे, श्याम धाईत हजर होते. प्रास्ताविक व संचालन अमोल आखाडे यांनी केले.