वनहक्क पट्टे मिळाले, आता आधुनिक शेतीला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:16+5:302021-09-27T04:40:16+5:30

केले. गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना त्या बोलत होत्या. आधुनिक शेतीला एकाने सुरुवात केली तर ते ...

Got forest rights leases, now give a boost to modern agriculture | वनहक्क पट्टे मिळाले, आता आधुनिक शेतीला चालना द्या

वनहक्क पट्टे मिळाले, आता आधुनिक शेतीला चालना द्या

Next

केले.

गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना त्या बोलत होत्या.

आधुनिक शेतीला एकाने सुरुवात केली तर ते पाहून इतरही शेतकरी पुढे येतील. यानंतर अजून गावे जोडली जातील. वनहक्क मिळाले, आता विविध योजनांची जोड देऊन मिळालेल्या संधीचा चांगला विनियोग करा. यातून निश्चितच आपले आर्थिक उत्पन्न वाढेल, असे त्या यावेळी म्हणाल्या.

कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास भागातील वनहक्क पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समिती मार्फत वनहक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १२ जणांना वनहक्क दावे वाटप केले. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील सातजणांना वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप केले, तर आरमोरी तालुक्यातील पाचजणांना वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक कुमारस्वामी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बाॅक्स

३१ हजार ७९५ जणांना मिळाले वनहक्क

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६ व नियम २००८, सुधारणा नियम २०१२ अंतर्गत जिल्हाभरात एकूण ३१ हजार ७९५ वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जमाती १७ हजार १२९ व इतर पारंपरिक १४ हजार ६६६ वनहक्क दाव्यांचा समावेश आहे. त्यांना ३७ हजार ७४० हेक्टर आर क्षेत्राचे वितरण करण्यात आले आहे. तसेच १ हजार ४२२ सामूहिक वनहक्क दावे मजूर झाले असून, त्यांना एकूण पाच लाख ३ हजार ३२२ हेक्टर आर क्षेत्राचे वितरण करण्यात आले आहे.

बाॅक्स

गडचिराेलीतच झाली विभागीय सुनावणी

जिल्हा स्तरीय समितीने वनहक्क दावे नामंजूर केल्यानंतर विभागीय स्तरावर सुनावणी होते. यानुसार जिल्ह्यातील दुर्गम भागातील अपीलधारकांना उपस्थित राहता यावे म्हणून गडचिरोलीमध्येच विभागीय स्तरावरील सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी नियोजन भवन येथे सर्व उपस्थितांची सुनावणी घेतली. यावेळी विभागीय वनहक्क समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Web Title: Got forest rights leases, now give a boost to modern agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.