गोवारी जमातीला सवलती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:37 AM2017-10-04T00:37:26+5:302017-10-04T00:37:39+5:30
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर विदर्भात गोंड गोवारी जमात नाही. गोंड व गोवारी या दोन अलग-अलग जमाती आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर विदर्भात गोंड गोवारी जमात नाही. गोंड व गोवारी या दोन अलग-अलग जमाती आहेत. या दोन्ही जमाती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहेत. मात्र गोंड गोवारी समाजाचे लोक गोवारी जमात आदिवासींमध्ये समाविष्ट नसल्याचा आरोप करीत आहेत. गोवारी जमात आदिवासी जमातीत समाविष्ट असल्याने गोवारी जमातीला आदिवासींच्या सर्व सोयीसुविधा देण्यात याव्या, अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती समिती, गोंडवानाच्या पदाधिकाºयांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
या सोयीसवलती न मिळाल्यास समाज संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाºयांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला कृती समितीचे अध्यक्ष क्रिष्णा सर्पा, दामोधर नेवारे, सुंदर बक्चुरिया, रूपेश चामलाटे, कोरचीचे नगरसेवक अरूण नायक, गजानन कोहळे, हिरासिंग कोराम, नत्थुजी सर्पा, श्यामकुमार यादव, टेकराम सर्पा आदी उपस्थित होते.
गोंड गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष गुलाब दयाराम मडावी व पदाधिकाºयांनी २४ एप्रिल १९८५ च्या शासन निर्णयात गोवारी जमात नसल्याचा आरोप केला आहे. द्वेषभावनेतून आदिवासींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम गुलाब मडावी करीत आहेत, असा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची केली.