मेडिकल कॉलेजसाठी शासन सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:13 AM2019-07-28T00:13:09+5:302019-07-28T00:14:28+5:30
गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे.
गडचिरोली हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल जिल्हा आहे. येथील आरोग्य व्यवस्था केवळ शासनाच्या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज असल्याची बाब खा. अशोक नेते यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पटवून दिली. देशभरातील ७५ रूग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर केले जाणार आहे. यामध्ये गडचिरोलीचाही समावेश केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले.
पुरेशी सुविधा मिळणार
वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक साधने राहतात. त्यांचा उपयोग उपचार करण्यासाठी होत असल्याने रूग्णांना चांगली वैैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.