शासनाने केलेली मानधनवाढ तुटपुंजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:02 AM2018-12-20T01:02:26+5:302018-12-20T01:03:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : महाराष्टÑ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटकच्या) वतीने शापोआ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीच्या मागणीसाठी ...

Government gross deficit slips | शासनाने केलेली मानधनवाढ तुटपुंजी

शासनाने केलेली मानधनवाढ तुटपुंजी

Next
ठळक मुद्देआंदोलनाला यश : शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महाराष्टÑ राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन (आयटकच्या) वतीने शापोआ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढीच्या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्टÑ शासनाने शापोआ कर्मचाºयांच्या मानधनात नुकतीच ५०० रूपयांची वाढ केली आहे. मात्र ही वाढ अतिशय तुटपुंजी आहे, असा आरोप युनियनचे राज्य महासचिव विनोद झोडगे यांनी केला आहे.
शापोआ कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष सुकुमार दामले, राज्य महासचिव शाम काळे यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे राज्यमहासचिव विनोद झोडगे, डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, जगदिश मेश्राम, अमोल मारकवार, कुंदा चलीलवार, जुबेदा शेख, गणेश चापले, सारीका वांढरे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील राज्य सदस्यांनी आंदोलने केली. किमान वेतन १८ हजार रूपये करण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देऊन चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण संचालक कार्यालय पुणे, मंत्रालय मुंबई, संसद भवन दिल्ली येथे विशाल मोर्चे, निदर्शने, उपोषण व धरणे करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्या निवासस्थानापुढे आंदोलने करण्यात आली. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबईच्या मंत्रालयावर हिवाळी अधिवेशनादरम्यान विशाल धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शापोआ कर्मचाºयांच्या मानधनात ५०० रूपयांची वाढ केली. मात्र ही वाढ अतिशय तुटपुंजी असल्याचे विनोद झोडगे यांनी म्हटले आहे.

Web Title: Government gross deficit slips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.