शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी सरकारी धोरणच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:18 PM2018-04-12T22:18:06+5:302018-04-12T22:18:06+5:30
विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन,....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यमान सरकारसह यापूर्वीच्याही सरकारांनी शेतकऱ्यांची केवळ फसवणूक करण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समितीच्या वतीने शहीद अभिवादन, शेतकरी जागृती यात्रा काढली जात आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
सुकाणू समितीच्या वतीने राज्यातील ३६ जिल्हे व कर्नाटक राज्यातील बेडगाव जिल्ह्यात शहीद अभिवादन शेतकरी जागृत यात्रा राबविली जात आहे. सदर यात्रा गडचिरोली येथे गुरूवारी दाखल झाली. यावेळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
पुढे माहिती देताना रघुनाथदादा पाटील म्हणाले, सातत्याने होणाºया शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा अभ्यास केला असता, उत्पादन खर्चाएवढाही भाव शेतमालाला मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काही शेतकºयांनी कोर्टात धाव घेतली. त्यानंतर काँग्रेस सरकारने स्वामीनाथन आयोगाची नेमणूक केली. या आयोगाने उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याची शिफारस केली. मात्र याकडे काँग्रेस सरकारने व विद्यमान भाजपा सरकारनेही दुर्लक्ष केले आहे. सध्याचे सरकार केवळ जुनेच धोरण अमलात आणत आहे. त्यामुळे याही सरकारच्या काळात शेतकºयांवर आत्महत्या करण्याची पाळी येत आहे. विरोधी पक्ष सुध्दा सरकारच्या विरोधात ठोस भूमिका घेत नाही. लोकप्रतिनिधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याऐवजी रस्त्यावर येऊन आंदोलनाच्या माध्यमातून गोंधळ घालत आहेत. यावरून सरकार व विरोधी पक्ष सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. केवळ राजकारणासाठी शेतकºयांच्या मुद्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावध होण्याची गरज आहे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, गणेश जगताप, संजय जगताप, आनंद भालेकर, आनंद शिंदे, रामेश्वर गाढे, चंद्रशेखर भडांगे, अरूण मुनघाटे, डॉ. महेश कोपुलवार, दत्तात्रय बर्लावार, भरत येरमे, पांडुरंग घोटेकर, देवराव चवळे आदी उपस्थित होते.
१४ मे रोजी जेलभरो आंदोलन
सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, शेतकरी पुन्हा कर्जाच्या खायीत सापडू नये, यासाठी उत्पादन खर्चाच्या अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सरसकट शेतकरी कर्ज व वीज बिल माफ करावे, आदी मागण्यांसाठी २३ मार्चपासून शहीद अभिवादन, शेतकरी जागृत यात्रा काढली जात आहे. या यात्रेचा पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर २७ एप्रिल रोजी समारोप होईल. १४ मे रोजी राज्यभरात जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. शेतकºयांनी स्वत:ची ताकद सरकारला दाखविण्यासाठी या आंदोलनात कुटुंबासह सहभाग नोंदवावा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.