स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात शासनाचे दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:53 PM2018-03-24T22:53:51+5:302018-03-24T22:53:51+5:30

राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचे पत्र काढले आहे.

Government pressure against cheap grain shoppers | स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात शासनाचे दबावतंत्र

स्वस्त धान्य दुकानदारांविरोधात शासनाचे दबावतंत्र

Next
ठळक मुद्दे१ एप्रिलपासून आंदोलन : संघटनेचा पत्रकार परिषदेत आरोप

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : राज्यभरातील रास्तभाव दुकानदारांनी १ एप्रिलपासून संप करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाने दुकानदारांविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचे पत्र काढले आहे. मात्र या पत्राला न घाबरता स्वस्त धान्य दुकानदार १ एप्रिलपासून आंदोलन करतील, अशी माहिती राशन, केरोसीन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैैलाश शर्मा यांनी दिली आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना मानधन देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते. पुरवठा मंत्र्यांनी मागण्या अमान्य केल्याने १ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांनी २२ मार्च रोजी पत्र काढले असून या पत्रानुसार एप्रिल महिन्याचे धान्य ३१ मार्चपूर्वीच दुकानदारांना वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. अन्नधान्याची उचल न केल्यास त्याचबरोबर दुकान बंद ठेवल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व राष्टÑीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ मधील तरतुदींचा भंग केल्याचे समजण्यात येईल व त्यांच्यावर दुकानाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्रात म्हटले आहे. मात्र मार्च महिन्याचे धान्य अजुनपर्यंत काही दुकानदारांना उपलब्ध झाले नाही. अशा परिस्थितीत एप्रिल महिन्याचे धान्य कसे काय स्वीकारणार. त्याचबरोबर मार्च महिन्याचे वाटप झाले नसताना अखेरचे शिल्लक दाखवायची कशी हा प्रश्न आहे. शासन केवळ स्वस्त धान्य दुकानदारांचा संप मोडीत काढण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यानुसार आंदोलन केले जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला कैलाश शर्मा यांच्यासह संघटनेचे जिल्हा सचिव अनिल भांडेकर, तालुकाध्यक्ष रमेश सोरदे, रामदास कुथे, दादाजी माकडे, भाष्कर वाघाडे, गोपाल मंडल, किशोर परसवानी, वासुदेव दुपारे, तोताजी आभारे उपस्थित होते.

Web Title: Government pressure against cheap grain shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.