काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध
By admin | Published: May 30, 2016 01:26 AM2016-05-30T01:26:21+5:302016-05-30T01:26:21+5:30
भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत.
गांधी चौकात निदर्शने : केंद्र शासनाच्या धोरणांवर केली टीका
गडचिरोली : भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र शासनाला २६ मे रोजी दोन वर्ष पूर्ण झाली. निवडणुकीच्या कालावधीत भाजपाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. जनतेसमोर अनेक समस्या आहेत. मात्र याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा २९ मे रोजी इंदिरा गांधी चौकात निदर्शने देऊन निषेध करण्यात आला.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेवराव उसेंडी, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अॅड. राम मेश्राम, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, पं. स. सदस्या अमिता मडावी, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, एनएसयूआयचे अध्यक्ष नितेश राठोड, रजनीकांत मोटघरे, शेखर आखाडे, जीवन कुत्तरमारे, महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष लतीफ रिझवी, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, डी. डी. सोनटक्के, नेताजी गावतुरे, बापुजी लेनगुरे, पी. टी. मसराम, वसीम पठाण, राजू आखाडे, गौरव आलाम, प्रतिभा जुमनाके, केवळराम नंदेश्वर, जितेंद्र भांडेकर, विवेक घोंगडे, राकेश गणवीर, बालू मडावी, एजाज शेख, अभिजीत धाईत, हेमंत मोहितकर, सचिन सोटक्के, अजर कुकुडकर, सिद्धार्थ बांबोळे, अजित खोब्रागडे, सचिन राठोड, अजय कुमरे, म्हशाखेत्री, चैतन्य अर्जुनवार, अजिंक्य टेकाम, मामिडवार, नचिकेत जंबेवार, जयंत मोरे, गुंजन थुलकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या कालावधीत भाजपाच्या नेत्यांना जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. देशातील शेतकरी, ग्राहक, नागरिक, कामगार, कर्मचारी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, महिला, युवक हे सर्व समाजातील घटक केंद्र शासनाच्या मागील दोन वर्षांच्या कारभारामुळे नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्धापनाचा प्रतिकात्मक निषेध केला व दुसरी पुण्यतिथी करून अच्छे दिनच्या फोटोला हार घालून निदर्शने केली. केंद्र शासनावर जनतेने विश्वास ठेवत हाती सत्ता सोपविली. यादरम्यान केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने देऊन सरकारचा निषेध केला. (नगर प्रतिनिधी)