ग्रा. पं. निवडणुकीतून अंगठे बहाद्दर हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:30 AM2021-01-04T04:30:05+5:302021-01-04T04:30:05+5:30
सिराेंचा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे. निर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचाची निवड ...
सिराेंचा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे. निर्वाचित सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उमेदवाराकरिता सातवी पासची अट घातल्याने अनेक अंगठेबहाद्दर हद्दपार झाले आहेत. या माध्यमातून नवीन पिढीला ग्रामपंचायतीच्या राजकारणात येण्याची संधी मिळाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याची अट निवडणूक आयोगाने घातली. त्यामुळे अंगठेबहाद्दर लाेकांना निवडणुकीत उमेदवार म्हणून लढता येणार नाही. १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या उमेदवारांचे शिक्षण सातवीपर्यंत नसेल तर त्यांना निवडणूक लढता येणार नाही. जिल्ह्यात दाेन टप्प्यांत ग्रामपंचायत निवडणुका हाेणार आहेत. यासाठी नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांना विविध प्रमाणपत्र व इतर दस्तावेज काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने थेट जनतेच्या माध्यमातून सरपंच निवड करण्याबाबत निर्णय घेतला हाेता; परंतु सत्तांतर झाल्यावर थेट सरपंच थेट निवडणूक रद्द करण्यात आली. निवडून आलेल्या सदस्यातून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गातील सरपंच निवड आहे. हे निश्चित नाही. उमेदवारसह पॅनेलप्रमुख अडचणीत आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्यांना सदस्य सरपंच पदासाठी सातवी पासची अट कायम ठेवली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतून अंगठाबहाद्दूर हद्दपार होणार आहेत.
बाॅक्स ..
शिक्षित उमेदवारांमुळे विकासाला मिळू शकते चालना
पूर्वी ग्रामपंचायत प्रशासनात निवडून आलेल्यांमध्ये अशिक्षित महिला, पुरुष सदस्यांचाच भरणा असायचा. त्यामुळे ग्रामपंचायतीचे एकूणच कामकाज अशाप्रकारे चालते याविषयी त्यांना ज्ञान नसायचे. गावाच्या विकासासाठी पत्रव्यवहार करताना शिक्षित गावपुढाऱ्याला घेऊन काम करावे लागत असे. सरपंच, अधिकारी, कर्मचारी व गावपुढारी महत्त्वाचे निर्णय घेत होते; परंतु आता शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याने गावाचा विकास हाेण्यास मदत हाेणार आहे. विशेष म्हणजे, ग्रा. पं. निवडणुकीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व गावपातळीवर आहे. आपल्या गटाकडे सत्ता असावी या भावनेतून प्रत्येक गट प्रयत्न करून निवडणुकीत मताधिक्य मिळविण्याचा प्रयत्न करताे.