पीक कर्जाचे फेरगठन वेळेत व्हावे
By admin | Published: June 5, 2016 01:05 AM2016-06-05T01:05:17+5:302016-06-05T01:05:17+5:30
खरीप पीक कर्ज व यापूर्वीच्या कर्जाची फेरआखणी वेळेत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : देसाईगंजात आढावा बैठक
गडचिरोली : खरीप पीक कर्ज व यापूर्वीच्या कर्जाची फेरआखणी वेळेत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. देसाईगंज येथे शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी पी. ई. नान्हे, वडसाचे उपवनसंरक्षक होशिंग, तहसीलदार संजय चरडे आदी उपस्थित होते. पीक कर्जाचे फेरगठन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कामास प्राधान्य देऊन सर्व शेतकऱ्यांना या हंगामात पीक कर्ज लवकर प्राप्त होण्यासाठी संबंधित यंत्रणा व अधिकाऱ्यांनी गतीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी धान खरेदीसंदर्भात धान खरेदीदार व वाहतूक करणाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. दरम्यान त्यांनी वडसा येथील धान गोदामास भेट दिली. शंकरपूर येथील मंडळ कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.