धानाच्या बोनस, चुकाऱ्यासाठी चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:43 AM2021-08-18T04:43:46+5:302021-08-18T04:43:46+5:30
आंदाेलनानंतर आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. खरीप हंगामात शासनाकडून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात ...
आंदाेलनानंतर आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. खरीप हंगामात शासनाकडून आधारभूत भावाने शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. परंतु शासनाने घोषित केल्याप्रमाणे अर्धाच बोनस वाटप करण्यात आला. एकीकडे खरीप हंगामातील बोनसची रक्कम प्रलंबित असताना नुकत्याच झालेल्या रबी हंगामातील धान व मका खरेदीचे चुकारेही देण्यात आले नाहीत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बोनस, बारदाण्याची रक्कम व रबी हंगामातील धान व मका खरेदीचे थकीत चुकारे सोसायट्यांचे कमिशन देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी भाजप तालुका अध्यक्ष नंदू पेट्टेवार, श्रीहरी कोपुलवार, ईश्वर पासेवर, पंकज खरवडे, नगर परिषदेचे सभापती विलास पारधी, सुनीता चांदेवार, दीपक निंबेकर, राहुल तितिरमारे, गुरुदेव ढोरे, सदानंद कुथे आदी अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
160821\42501812-img-20210816-wa0028.jpg
शेतकऱ्यांचे थकीत बोनस व धानाच्या चुकाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन करताना भाजपचे पदाधिकारी