धानाचे चुकारे, बारदाना रक्कम व संस्थांचे कमिशन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:33 AM2021-04-26T04:33:15+5:302021-04-26T04:33:15+5:30

शासन - प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना धान विक्री करताना मानसिक व शारीरिक त्रास दरवर्षी सहन करावा लागतो. ...

Grain errors, bagging amounts and institutional commissions stalled | धानाचे चुकारे, बारदाना रक्कम व संस्थांचे कमिशन रखडले

धानाचे चुकारे, बारदाना रक्कम व संस्थांचे कमिशन रखडले

googlenewsNext

शासन - प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना धान विक्री करताना मानसिक व शारीरिक त्रास दरवर्षी सहन करावा लागतो. धान विक्री केल्यानंतर चुकारे वेळेत मिळत नसल्यामुळे आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. मागील वर्षी शेतकरी बांधवांनी स्वत:चा बारदाना दिला. परंतु बारदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. एक ते दीड वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात बारदानाचे पैसे जमा झाले नाहीत. या वर्षीच्या चालू हंगामातसुध्दा शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळाले नाहीत. संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यात धानाचे चुकारे व बारदानाची रक्कम लवकर द्यावी, तसेच आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे मागील वर्षीचे व चालू वर्षाचे कमिशन मंडी चार्ज अदा करावे व धान खरेदी केंदावरील धानाची उचल लवकर करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा आविका उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केली आहे.

Web Title: Grain errors, bagging amounts and institutional commissions stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.