धान्य साठवणुकीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:09 AM2017-10-11T00:09:12+5:302017-10-11T00:09:24+5:30

आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे.

Grain storage planning | धान्य साठवणुकीचे नियोजन

धान्य साठवणुकीचे नियोजन

Next
ठळक मुद्देआधारभूत धान खरेदी : ७३ हजार क्विंटल क्षमतेची गोदामे उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेले धान्य सुरक्षित राहावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ७३ हजार क्विंटल साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात महाराष्टÑ स्टेट को-आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडची बिगर आदिवासी क्षेत्रात मुख्य अभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. गडचिरोली धान खरेदी केंद्राअंतर्गत पाच हजार क्विंटल धान्य साठवणुकीची क्षमता असलेले गोदाम आहे. आरमोरी येथे तीन हजार क्विंटल साठवणूक क्षमतेचे गोदाम आहे. त्याचबरोबर देसाईगंज येथे १० हजार क्विंटल, चामोर्शी येथील डीएमओ गोदामाची क्षमता पाच हजार क्विंटल, येनापूर येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, आष्टी येथील गोदामाची क्षमता १० हजार क्विंटल, चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम येथील वन समितीच्या गोदामाची क्षमता तीन हजार क्विंटल, विवेकानंदपूर येथील गोदाम २० हजार क्विंटल, मथुरानगर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, गणपूर येथील गोदाम १ हजार ५०० क्विंटल, घोट येथील गोदामाची क्षमता २ हजार ५०० क्विंटल एवढी आहे. या सर्व गोदामांची एकूण क्षमता ७३ हजार क्विंटल एवढी आहे.
धान्याची खरेदी केल्यानंतर भरडाईसाठी काही कालावधी लागत असल्याने या कालावधीत धान्य सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर धान्य पावसाच्या पाण्यात भिजण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक खरेदी केंद्राच्या जवळपासचे गोदाम धान्य साठवणुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सद्य:स्थितीत जिल्हाभरात पावसाचा जोर सुरू आहे. अशातच १६ आॅक्टोबरपासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. खरेदी केलेले धान्य भिजू नये, शेतकरी व शासनाचे सुद्धा नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले आहे.

चार वर्षांपूर्वी झाले होते कोट्यवधींचे नुकसान
४चार वर्षांपूर्वी आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेले कोट्यवधी रूपयांचे धान्य पावसाच्या पाण्यात भिजले होते. शेतकºयांकडून खरेदी केलेले धान्य खरेदी केंद्राच्या परिसरातच ठेवण्यात आले होते. काही ठिकाणचे धान्य कुजून उग्र वास येत होता. या घटनेची पुनर्रावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर्षी अगदी सुरुवातीलाच गोदामांचे नियोजन केले असल्याचे दिसून येत आहे. नियोजनानुसार मात्र धान्याची उचल होऊन ते तत्काळ गोदामामध्ये पोहोचणे आवश्यक आहे. कधीकधी वाहनाअभावी वाहतुकीस अडथळा होत असल्याचा अनुभव आहे.

Web Title: Grain storage planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.