ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 01:02 AM2018-05-19T01:02:26+5:302018-05-19T01:02:26+5:30

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मे २०१७ पासून मानधन मिळाले नाही. सदर मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका शाखा कोरचीच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.

Gram Panchayat employees' fasting | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण

googlenewsNext
ठळक मुद्देकोरची पं.स.समोर : वर्षभरापासून मानधन रखडल्याने आर्थिक अडचण

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मे २०१७ पासून मानधन मिळाले नाही. सदर मानधन देण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका शाखा कोरचीच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनावर त्यांना प्रपंच भागवावा लागतो. मात्र मागील वर्षभरापासून मानध्नन न मिळाल्याने ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. मानधन देण्यात यावे, यासाठी प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासन व शासनाने सुध्दा दखल घेतली नाही. त्यामुळे १८ मे पासून आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. या आंदोलनात फगणुराम पुडो, शामलाल सामरथ, बिकेंद्र नैताम, आनंद पुडो, मुकेश उईके, डी. एम. परचारी, देवप्रसाद नैताम, बलीराम मडावी, डी. एम. उईके, पंढरी कुसनाके, आर. एन. बाटघुवर, संतोष यादव, निलाराम नैताम, लोमन सोनवरला, अरविंद मडावी, महादेव कुमरे, महेश राऊत, कृष्णा उईके यांनी सहभाग घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. कोरचीसह जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचेही मानधन रखडले आहे, हे विशेष.

Web Title: Gram Panchayat employees' fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.