पथदिवे व हातपंप बंद तरीही ग्रामपंचायत उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:47+5:302021-09-17T04:43:47+5:30
घाेट गटग्रामपंचायत अंतर्गत ५ गावांचा समावेश असून ८ हजारांच्या आसपास लाेकसंख्या आहे. येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर येथे प्रशासक नियुक्त ...
घाेट गटग्रामपंचायत अंतर्गत ५ गावांचा समावेश असून ८ हजारांच्या आसपास लाेकसंख्या आहे. येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर येथे प्रशासक नियुक्त करण्यात आले. सध्या संपूर्ण वाॅर्डातील अनेक पथदिवे बंद आहेत. त्यात ग्रामपंचायतसमोरील हायमास्ट बंद असून ५ वाॅर्डातील ५० बल्ब बंद आहेत. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. वाॅर्ड क्रमांक १ मधील ४ हातपंप बंद आहेत. गावातील सुधाकर चंदनखेडे, बंडू जुवारे, नीलकंठ गेडाम यांच्या घराजवळील हातपंप काही महिन्यांपासून बंद आहेत, तर वाॅर्ड क्रं. १ मधील सुरेश उपाध्ये यांच्या घराजवळील हातपंपाला ३ महिन्यांपासून गढूळ पाणी येत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बहुतांश वाॅर्डात घाण पसरली आहे. परंतु उपाययाेजना करण्याकडे प्रशासकांचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासक ग्रामपंचायतमध्ये कधी येतात व कधी जातात, याबाबत गावातील नागरिकांना व ग्रा. पं. कर्मचाऱ्यांनाही माहिती नाही, असा आराेप नागरिकांनी केला आहे.