ग्रामपंचायत सदस्याचा सर्पदंशाने मृत्यू
By admin | Published: June 16, 2017 12:44 AM2017-06-16T00:44:48+5:302017-06-16T00:44:48+5:30
तालुक्यातील अरसोडा येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य कविता रमेश मैंद (३५) यांना विषारी सापाने दंश केल्याने
अरसोडातील रहिवासी
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील अरसोडा येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य कविता रमेश मैंद (३५) यांना विषारी सापाने दंश केल्याने त्यांचा गुरूवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे मृत्यू झाला.
कविता मैंद या बुधवारी माहेरी ब्रह्मपुरी तालुक्यातील जेवनाळा येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. जेवन करून झोपल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला विषारी सापाने दंश केला. आपल्याला काही तरी चावला आहे, असे लक्षात येताच त्या झोपून जाग्या झाल्या. त्यावेळी विषारी साप दिसून आला. पहाटे ४ वाजता आरमोरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. प्रकृती गंभीर असल्याने गुरूवारी सकाळीच गडचिरोली येथील जिल्हा रूग्णालयात त्यांना रेफर करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा गुरूवारी ९.३० वाजता मृत्यू झाला. कविता मैंद यांना दोन लहान मुले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला मदत देण्याची मागणी आहे.