भांडवलशाही विरोधात ग्रामसभा व महिला संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:48 PM2018-03-12T23:48:37+5:302018-03-12T23:48:37+5:30

सावित्रीबाई फुले स्मृती दिवस व वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त भामरागड पट्टी, सुरजागड पट्टी, पेरमिली इलाका समिती व सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील लिंगोबाबा मैदानावर शनिवारी महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा पार पडली.

Gram Sabha and women fight against capitalism | भांडवलशाही विरोधात ग्रामसभा व महिला संघर्ष करणार

भांडवलशाही विरोधात ग्रामसभा व महिला संघर्ष करणार

googlenewsNext
ठळक मुद्देमार्गदर्शन : भामरागडच्या महिला अधिकार संमेलनात निर्धार

आॅनलाईन लोकमत
भामरागड : सावित्रीबाई फुले स्मृती दिवस व वीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त भामरागड पट्टी, सुरजागड पट्टी, पेरमिली इलाका समिती व सर्व ग्रामसभांच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील लिंगोबाबा मैदानावर शनिवारी महिला अधिकार संमेलन व जाहीर सभा पार पडली. या संमेलनात उपस्थित महिलांनी भांडवलशाही विरोधात संघर्ष मजबूत करण्याचा निर्धार केला.
या संमेलनाला मध्यप्रदेश येथील जागृत दलित-आदिवासी संगठनच्या पदाधिकारी माधुरी, रेडिकल आंबेडकराईट महिला असोसिएशन महाराष्ट्राच्या संघटिका धम्मसंगिनी रमागोरख, सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख, लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या समीक्षा आमटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच मंचावर अध्यक्षस्थानी भामरागड इलाका पारंपारिक गोटूल समितीच्या सदस्य राजाश्री लेखामी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य शीला गोटा, माजी जि.प. सदस्य ग्यानकुमारी कौशी, अंगणवाडी सेविका सपना रामटेके, पं.स. उपसभापती प्रेमिला कुड्यामी, पं.स. सदस्य गोई कोडापे, भामरागड पट्टी पारंपरिक समितीचे अध्यक्ष मुन्शी धुर्वा, जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नागोटी, पं.स. सभापती सुखराम मडावी, सरपंच बालाजी गावडे, नगरसेविका वासंती गेडाम, धुर्वे आदी उपस्थित होते.
सदर महिला अधिकार संमेलन व जाहीर सभेला भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील शेकडो ग्रामसभा प्रतिनिधी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे सदर कार्यक्रमाला क्षेत्रातील महिलांचा बहुसंख्येने सहभाग होता. यावेळी मान्यवरांनी ग्रामसभांच्या अधिकार व कर्तव्याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Gram Sabha and women fight against capitalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.