अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:29 PM2018-11-26T22:29:53+5:302018-11-26T22:30:07+5:30

तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली.

Gram Sabha widespread agitation against injustice | अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

अन्यायाविरोधात ग्रामसभा व्यापक आंदोलन छेडणार

Next
ठळक मुद्देजुव्वी गावात बैठक : बांबू, तेंदू विक्री, बँक खात्यांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील जुव्वी येथे संयुक्त ग्रामसभा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी वर्षात बांबू व तेंदू विक्री व्यवहार तसेच वनकायद्यानुसार सामूहिक वनहक्क संनियंत्रण समितीचे बँक खाते काढणे, याच खात्यातून आर्थिक व्यवहार करण्याचा ठराव घेण्यात आला. या ठरावावर चर्चाही करण्यात आली. तसेच जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर अन्याय, अत्याचाराच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी चुक्कू पुंगाटी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड.लालसू नगोटी, पं.स.सभापती सुखराम मडावी, प्रेमिला कुड्यामी उपस्थित होते. सदर बैठकीत ग्रामसभांच्या आंदोलनामध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, ग्रामसभांचे अध्यक्ष व सचिव पदावर महिलांना सामावून घेणे, ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करणे, दर महिन्याला एकदा तालुकास्तरावर ग्रामसभा आढावा बैठक घेणे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. याशिवाय आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी वने अधिकार मान्यता कायद्यात देऊ केलेल्या परिसर हक्का दाव्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सूरजसागडसह जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या व प्रस्तावित सर्व खदानींना विरोध करणाऱ्या इतर ग्रामसभांच्या वतीने समर्थन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिकोनातून ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी पुढाकार घेतले पाहिजे, असेही उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.
भामरागड तालुक्यातील ज्या गावांना महसूल गाव म्हणून अद्यापही घोषित करण्यात आले नाही, अशी गावे महसुली गाव म्हणून घोषित होण्यासाठी ग्रामसभांनी पाठपुरावा करावा, असा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला. विद्यमान सरकार भामरागड तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती भिषण आहे. मूलभूत समस्यांही कायम आहेत. या समस्यांना घेऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड.नोगोटी यांनी सांगितले.

Web Title: Gram Sabha widespread agitation against injustice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.