जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्रित यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:05 AM2017-10-16T00:05:44+5:302017-10-16T00:05:54+5:30

गावाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन महासंघ तयार करावा व काम करावे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.

Gramsabhas should be collected for the development of the district | जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्रित यावे

जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्रित यावे

Next
ठळक मुद्देआ. डॉ. देवराव होळी यांचे प्रतिपादन : आदिवासी देवतांची महापूजा व ग्रामसभांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन महासंघ तयार करावा व काम करावे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
गडचिरोली शहरातील चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी येथे १४ आॅक्टोबर रोजी आदिवासी देवतांची महापूजा करण्यात आली तर १५ आॅक्टोबर रोजी ग्रामसभांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, प्रकाश महाराज काटेंगे, आदिवासी सेवक प्रमोद पिपरे, रंगय्या मडावी, सुरेश बारसागडे, यादव कोल्हे, डॉ. सुरेश चौधरी, माधव गोटा, देवाजी पदा, डॉ. सूर्यवंशी, माधव गावडे, शिवाजी नरोटे, नरेंद्र भांडेकर, वसंत कुलसंगे आदी उपस्थित होते. या मेळाव्यात ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले व तसे ठराव पारित केले. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ग्रामसभांचा एक जिल्हा ग्रामसभा महासंघ स्थापन करण्यात आला. त्याचे मुख्य प्रवर्तक देवाजी तोफा यांना ठरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना देवाजी तोफा यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सामूहिक वनहक्क, पेसामधील टोली, वाडी, गावांच्या ग्रामसभांचे सक्षमीकरण व बळकटीकरण कसे करता येईल, याबाबत माहिती देऊन ग्रामसभा महासंघाचे महत्त्व पटवून दिले.
मेळाव्यादरम्यान सुरेश बारसागडे, डॉ. सूर्यवंशी यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकाश काटेंगे, संचालन डॉ. सुरेश चौधरी यांनी केले. मेळाव्याला जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Gramsabhas should be collected for the development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.