ग्रामसेवकांची दुष्काळग्रस्तांना मदत

By Admin | Published: October 16, 2015 01:55 AM2015-10-16T01:55:07+5:302015-10-16T01:55:07+5:30

जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थे गडचिरोलीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रूपयांची मदत दिली आहे.

Gramsevaks help drought victims | ग्रामसेवकांची दुष्काळग्रस्तांना मदत

ग्रामसेवकांची दुष्काळग्रस्तांना मदत

googlenewsNext

५१ हजार रूपयांचा धनादेश : जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
गडचिरोली : जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थे गडचिरोलीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी ५१ हजार रूपयांची मदत दिली आहे. मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांच्या मार्फतीने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
यावर्षी राज्यभरात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला असून हलाखीचे जिवन जगण्याची पाळी त्याच्यावर येणार आहे. पाळीव जनावरांसाठीही चारा मिळणे कठीण जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी चांगली उपाय योजना करता यावी, यासाठी सामाजिक उत्तरदायित्व, कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने ५१ हजार रूपयांची मदत राज्य शासनाकडे पाठविण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, पतसंस्थेचे अध्यक्ष राजकुमार पारधी, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, पतसंस्थेचे सचिव पांडुरंग पेशने, उपाध्यक्ष व्यंकटेश गंजीवार, मनोज मेश्राम, महीम सय्यद, धर्मेंद्र फरदे, विलास दुर्गे, वसंत सातपुते, वैभव कहुरके, विनोद पाल, माया बाळराजे, रमेश बोरकुटे, खुशाल नेवारे, मधुकर कुकडे, रमेश मेश्राम, नीलेश जवंजालकर उपस्थित होते. संघटनेच्या या प्रेरणादायी उपक्रमाची जिल्ह्यातील नागरिकांनी कौतुक केले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Gramsevaks help drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.