वेतनवाढ मंजूर करून पगार निकाली काढा
By admin | Published: July 9, 2016 01:42 AM2016-07-09T01:42:48+5:302016-07-09T01:42:48+5:30
पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेले डी. पी. सपाटे यांचा सोमवारी महाराष्ट्र राज्य ...
नवनियुक्त बीईओंना निवेदन : शिक्षक समितीची मागणी; डी. पी. सपाटे यांचा सत्कार
धानोरा : पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेले डी. पी. सपाटे यांचा सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा धानोराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून वेतनवाढ मंजूर करून पगार निकाली काढण्याची मागणी केली.
धानोरा येथील गटशिक्षणाधिकारी पांडुरंग कोल्हे यांचे स्थानांतरण झाल्याने त्यांच्या जागेवर डी. पी. सपाटे नव्याने रूजू झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा धानोराच्या वतीने डी. पी. सपाटे यांची भेट घेऊन त्यांना निवडक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, मासिक पगार वेळेत करावे, शिक्षण विभागातील रिक्त असलेले वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपीक या विषयी निर्णय घेऊन तत्काळ पदस्थापना करावी, सेवापुस्तक अद्ययावत करून नोंदी घ्याव्या. जुलै महिन्याची वार्षिक वेतनवाढ मंजूर करून पगार काढावे, अप्रशिक्षित शिक्षकांची थकीत असलेली वार्षिक वेतनवाढ लावून वेतन वाढीच्या फरकाची रक्कम द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. त्यांनीही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे धानोरा तालुकाध्यक्ष डंबेश पेंदाम, सचिव अण्णा बावनथडे, सोमेश्वर दुगे, भावेश उईके, सचिन मेश्राम, नरेंद्र पेंदाम, प्रवीण सहारे, रवींद्र घोंगडे, दिलीप शेडमाके, हेमंत घोरापटिया, विलास दरडे, खुशाल भोयर, अमर पेंढारकर, राजेंद्र भजभुजे, प्रकाश नागापुरे, ओमप्रकाश सिडाम, प्रफुल सिडाम, अरूण सातपुते, नंदकिशोर नैताम, मोरेश्वर अंबादे, किशोर धाईत, हिराचंद वेलादी, किटे, रजनी कुमरे उपस्थित होत्या.