तीन वर्षांपासून शाैचालय बांधकामाचे अनुदान रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:52+5:302021-06-30T04:23:52+5:30
मुलचेरा नगर पंचायतअंतर्गत २०१७ - १८ व २०१८ - १९ या वर्षात व त्यानंतरही शाैचालये गरीब व गरजू नागरिकांना ...
मुलचेरा नगर पंचायतअंतर्गत २०१७ - १८ व २०१८ - १९ या वर्षात व त्यानंतरही शाैचालये गरीब व गरजू नागरिकांना मंजूर करण्यात आली. शाैचालय मंजूर हाेताच अनेकांनी स्वत:कडील व ज्यांच्याकडे पैसे नव्हते, अशा लाभार्थ्यांनी उसनवार घेऊन शाैचालयाचे बांधकाम पूर्ण केले. एक - दाेन महिन्यात अनुदानाची रक्कम मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा हाेती. परंतु तसे झाले नाही. मागील तीन वर्षांपासून वैयक्तिक शाैचालयाचे अनुदान रखडले आहे. अनुदानाची रक्कम मिळावी, यासाठी लाभार्थ्यांनी नगर पंचायत कार्यालयात चकरा मारल्या. तरीसुद्धा दखल घेण्यात आली नाही. लाभार्थ्यांनी स्वतः पैशांची गुंतवणूक करून तसेच काहींनी उधारीवर साहित्य खरेदी करून शाैचालयांचे बांधकाम पूर्ण केले. चालू वर्षातही अनेकांनी शाैचालयांचे बांधकाम केले आहे. त्यांनाही अनुदान मिळाले नाही. लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत शाैचालयाचे रखडलेले अनुदान आठवडाभरात अदा करावे, अन्यथा लाभार्थ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक उमेश पेळूकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनातून दिला. निवेदन देताना बंडू बर्लावार, ईश्वर डुबुलवार, सुनील बाहुरे, श्रीधर बर्लावार उपस्थित होते.
बाॅक्स
कृषी निविष्ठा खरेदीसाठी पैशांची गरज
वैयक्तिक शाैचालयांचा लाभ घेणारे लाभार्थी हे बहुतांश शेतकरी व मजूर आहेत. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. आधीच दुसऱ्यांकडून उसनवार घेऊन वैयक्तिक शाैचालयांचे बांधकाम केले आहे. त्यातच पुन्हा दुसऱ्यांकडून उसनवार पैसे मिळणे शक्य नाही. त्यामुळे रखडलेले अनुदान लवकर द्यावे, अशी मागणी शाैचालय लाभार्थ्यांनी केली.
===Photopath===
290621\img-20210629-wa0010.jpg
===Caption===
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना शाैचालय बांधकाम लाभार्थी.