महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

By admin | Published: May 16, 2016 01:26 AM2016-05-16T01:26:32+5:302016-05-16T01:26:32+5:30

वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा व गेल्या चार-पाच दिवसांपासून तब्बल सहा तास भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आरमोरी येथील भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी

The gravity of the junior engineers of MSEDCL | महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना घेराव

Next

आरमोरी : वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा व गेल्या चार-पाच दिवसांपासून तब्बल सहा तास भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या आरमोरी येथील भाजप पदाधिकारी व शेकडो नागरिकांनी रविवारी येथील वीज वितरण कंपनीच्या पॉवर हाऊसमध्ये जाऊन कनिष्ठ अभियंता बोरकर यांना घेराव घातला.
सध्या मे महिना सुरू असून आरमोरी शहरात प्रचंड उष्णतामान आहे. अशा परिस्थितीत मागील चार-पाच दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. रात्री सुध्दा अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी येथील पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. खंडीत वीज पुरवठा व होणारे भारनियमनाला त्रस्त झालेल्या संतप्त भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कनिष्ठ अभियंता बोरकर यांना घेराव घातला. दरम्यान कनिष्ठ अभियंता बोरकर यांनी आरमोरी शहरात दररोज सहा तास भारनियमन असल्याचे सांगितले. यावर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती जाहिररित्या दिली नाही. खंडीत वीज पुरवठ्याची समस्या तत्काळ निकाली काढावी, तसे भारनियमन बंद करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. सदर समस्या मार्गी न लागल्यास वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. घेराव घातला असल्याची माहिती मिळताच आरमोरीचे प्रभारी ठाणेदार बाळासाहेब नरवटे, पोलीस उपनिरिक्षक पंकज दाभाळे, राजगडे हे घटनास्थळी दाखल झाले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, युगल सामृतवार, स्वप्नील धात्रक, अंकूश खरवडे आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

थकीत वीज बिलामुळे भारनियमन
आरमोरी शहरात वीज बिलाची एकूण ८० टक्के वसुली झाली आहे. १०० टक्के वसुली झाली नसल्याचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीच्या वतीने भारनियमन केल्या जात आहे. लगतच्या इतर तालुक्यात भारनियमन नसताना केवळ आरमोरी शहर भारनियमन कसे काय असा सवालही भाजप पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना केला. यावर आम्हाला वरिष्ठ स्तरावरून भारनियमन करण्याच्या सूचना आहेत, असे बोरकर यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंत्याशी संपर्क नाही

त्यानंतर आरमोरी येथील कार्यकारी अभियंता आढाव यांना पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून भारनियमन व खंडीत पुरवठ्याबाबत जाब विचारण्यासाठी संपर्क साधला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत होता.

Web Title: The gravity of the junior engineers of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.