सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:04 AM2018-06-29T00:04:52+5:302018-06-29T00:06:42+5:30

सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.

Great demand for organic farmland | सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

सेंद्रिय शेतमालाला उत्तम मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाजी चव्हाण यांचे प्रतिपादन : ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सेंद्रिय शेतीबाबत शेतकरी व ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असे आवाहन अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक संतोष डुकरे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड नागपूर आणि अ‍ॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेंद्रीय शेतमाल निर्यात संधी’ कार्यशाळेचे आयोजन दिनांक २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते़ या कार्यशाळेदरम्यान डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेडचे उपमहासंचालक संभाजी चव्हाण बोलत होते. कार्यशाळेला विभागीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ.अजयसिंग राजपूत, अ‍ॅग्रोेव्हिजन फाऊंडेशनचे संतोष डुकरे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, कृषी सभापती नाना नाकाडे, आर.सी.ओ.एफ.चे सहसंचालक डॉ. वाय.व्ही.देवघरे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, आत्माचे संचालक डॉ.प्रकाश पवार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ.एस.बी.अमरशेट्टीवार, वृंदा काटे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान संतोष डुकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात उत्पादित होणारे फळ, सिंदी, आंबा व धानपीक यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शेतकºयांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. संभाजी चव्हाण यांनी सेंद्रीय शेती प्रमाणिकरण, योजना, अनुदाने, निर्यातीतील संधी, निर्यात कशी करायची, निर्यातीसाठी असलेल्या सुविधा, परदेश व्यापार आदी बाबतची माहिती दिली. डॉ.प्रकाश पवार यांनी गडचिरोली जिल्हा सेंद्रीय पिकविल्या जाणाºया धान, तूर व इतर शेती उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. शेतकरी गटांमार्फत शेतमाल प्रक्रियेलाही गती दिली जात आहे. येथील सेंद्रीय शेती उत्पादकांनी दिल्लीपर्यंत धडक मारली आहे, असे मार्गदर्शन केले.
धानासोबतच आयुर्वेदिक पिकांचे उत्पादन करून प्रगतीकडे जाण्याची गरज आहे. सेंद्रीय शेतमालाच्या माहितीबाबत काही शंका असल्यास शेतकºयांनी कृषी विज्ञान केंद्र गडचिरोेली येथे संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रम समन्वयक संदीप कराळे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांनी देशाअंतर्गत बाजारपेठ काबिज करून निर्यात प्रोत्साहन करण्यास प्रशासन अनुकूल असल्याचे सांगितले. सर्वोतोपरी शेतकºयांना मदत करण्याचे आश्वासन दिले. डॉ.अमरशेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जवस पिकासाच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ अनिल तारू, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम यांनी सहकार्य केले.

Web Title: Great demand for organic farmland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.