व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:50 PM2018-08-23T23:50:15+5:302018-08-23T23:50:59+5:30

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

Greater dominance over the management council | व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

व्यवस्थापन परिषदेवर महाआघाडीचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देगोंडवाना विद्यापीठ : ८ पैकी ६ जागा पटकावल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ८ पैकी ६ जागांवर विजय मिळवत महाआघाडीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित शिक्षक मंचला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत राखीव गटातील महाआघाडीच्या सदस्यांची अविरोध निवड झाली. त्यात एससी प्रवर्गात प्राचार्य गटातून डॉ.प्रमोद काटकर, ओबीसी प्रवर्गात व्यवस्थापन गटातून डॉ.विवेक शिंदे, एनटी प्रवर्गात शिक्षक गटातून डॉ.दुधपचारे यांचा समावेश आहे. व्हीजेएनटी प्रवर्गात पदवीधर गटातून कटकमवार हे अविरोध निवडून येणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक बाबी उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे तो निकाल न्यायप्रविष्ठ होणार आहे.
निवडणूक झालेल्या खुल्या प्रवर्गातील विजयी उमेदवारांमध्ये महाआघाडीचे तीन सदस्य निवडून आले. त्यात प्राचार्य गटातून डॉ.राजाभाऊ मुनघाटे, व्यवस्थापन गटातून कीर्तीवर्धन दीक्षित तर पदवीधर गटातून अभय लोंढे हे विजयी झाले. शिक्षक मंचचे एकमेव उमेदवार पराग धनकर हे विजयी झाले आहेत.

Web Title: Greater dominance over the management council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.