आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:12 PM2018-01-07T23:12:40+5:302018-01-07T23:12:52+5:30
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शनिवारी पत्रकार संघटनांमार्फत जिल्हाभर साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शनिवारी पत्रकार संघटनांमार्फत जिल्हाभर साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
मुलचेरा : तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने स्थानिक विश्रामगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. रणजित मंडल होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुभाष आत्राम, पं.स. सभापती सुवर्णा येमुलवार, सरपंच ममता बिश्वास, विशेष अतिथी म्हणून राकाँचे तालुकाध्यक्ष रंजीत स्वर्णकार, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, न.पं. उपाध्यक्ष देवा चौधरी, जि.प. सदस्य रॉबीन शहा, सरपंच हरीपद पांडे, नगरसेवक दीपक परचाके, उमेश पेडुकर, विमल बाला, मनोज बंडावार, अब्दुल लतीफ शेख, निखिल इज्जतदार, अपूर्व मुजूमदार, सुभाष गणपती उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जि.प. सदस्य युध्दीष्टीर बिश्वास यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका पत्रकार संघाच्या १० पत्रकारांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनातर्फे लेखणी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रवींद्र शहा, संचालन गजानन आंभोरे तर आभार पीएसआय डी. एस. मोरे यांनी मानले.
वैरागड : वैरागड येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, क्षेत्र सहायक ए. व्ही. मेश्राम, वनरक्षक श्रीकांत सेलोटे, पत्रकार प्रा. प्रदीप बोडणे, रामदास डोंगरवार, मनोज खोब्रागडे, ग्रा.पं. सदस्य अतुल मेश्राम, यशवंत मडावी, प्रवीण राऊत उपस्थित होते.
भामरागड : पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुका पत्रकार संघातर्फे निर्मित पत्रकार भवनाचे लोकार्पण करण्यात आले. तहसीलदार कैलाश अंडील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर परसलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी ताणाजी बर्डे, प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, नगराध्यक्ष राजू वड्डे, सब्बर बेग मोगल, न.पं. उपाध्यक्ष शारदा कंबगोणीवार, पं.स. सदस्य गोई कोडापे, ठाणेदार अंजली राजपूत उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी रमेश मारगोनवार, डॉ. विलास तळवेकर, महेंद्र कोठारे, श्रीराम झोडे, श्रीकांत मोडक, गोविंद चक्रवर्ती, हाबीद शेख, मनिष येमुलवार, राजू कोठारे, प्रदीप कर्मकार, शामराव येरकलवार, कविश्वर मोतकुरवार, अजय तीर्थगिरीवार यांनी सहकार्य केले. संचालन लीलाधर कसारे तर आभार डॉ. सोमेश्वर सेलोकर यांनी मानले.
कुरखेडा : तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार अजय चरडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भैसारे, सिराज पठाण, बंडू लांजेवार, राम लांजेवार, गीतेश जांभुळे उपस्थित होते. संचालन व आभार प्रा. विनोद नागपूरकर यांनी मानले.
देसाईगंज : पत्रकार दिनानिमित्त मॅरेथॉन दौड व एकलनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. सकाळी ८ वाजता न्यायाधीश सिंघेल व सीआरपीएफ १९१ बटालियनचे कमांडंट त्रिपाठी यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. या स्पर्धेत तालुक्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी व सीआरपीएफ जवान सहभागी झाले. सकाळी ११ वाजता आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते एकलनृत्य स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शालू दंडवते, माजी प्राचार्य एस. एन. पठाण, जेसा मोटवानी, ज्येष्ठ पत्रकार शा. मो. बारई उपस्थित होते. यशस्वीतेसाठी देसाईगंज प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रभाग दुबे, उपाध्यक्ष दिलीप कहुरके, सचिव इलियास पठाण, सहसचिव महेंद्र चचाणे, पुरूषोत्तम भागडकर, अरविंद घुटके, दयाराम फटींग, आरीफ शेख, अरूण राजगिरे, विष्णू दुनेदार, अतुल बुराडे, जितेंद्र परसवानी, विलास ढोरे, राजरतन मेश्राम, चंद्रकुमार कुकरेजा, डॉ. चंद्रशेखर बांबोळे, महेश सचदेव, नासीर झुमन शेख, प्रकाश दुबे, रवींद्र कुथे, हेमंत दुनेदार, मिर उमेद अली, अशोक माडावार, राहूल मेश्राम, वहीद शेख, जाफर शेख, फिरोज लालानी यांनी सहकार्य केले.
कोरची : पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण रूग्णालयाला भेट देण्यात आली. कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती कचरीबाई काटेंगे होत्या. विशेष अतिथी म्हणून तहसीलदार पुष्पा कुमरे, नगरसेवक श्यामलाल मडावी, मनोज अग्रवाल, हरीभाऊ राऊत, डी. ए. शिरगावे, डॉ. राऊत, डॉ. कवाडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, सचिव राष्टपाल नखाते, शालिकराम कराडे, राहूल अंबादे, बुधराम सहारे, अरूण नायक, लालचंद जनबंधू उपस्थित होते. संचालन शालिक कराडे तर आभार राष्टÑपाल नखाते यांनी मानले.
आरमोरी : महाराष्टÑ राज्य ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन वन विभाच्या विश्रामगृहात करण्यात आले. याप्रसंगी प्रा. गंगाधर जुवारे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमराव मेश्राम, सचिव गंगाधर चिचघरे, गोवर्धन काळे, चुन्नीलाल मोटघरे, सुरेश कांबळे, कमलाकर चाटारे, पंकज खोब्रागडे, हिरालाल येरमे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.