विविध उपक्रमांनी बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:37 AM2021-04-16T04:37:01+5:302021-04-16T04:37:01+5:30
गडचिराेली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार १४ एप्रिल राेजी जिल्ह्यात उत्साहात साजरी ...
गडचिराेली : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुधवार १४ एप्रिल राेजी जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, पक्ष व सामाजिक संघटनांतर्फे कार्यक्रम घेण्यात आला.
चनकाईनगर, वाॅर्ड क्र. २३ गडचिराेली
येथील हनुमान मंदिर सभागृहात बुधवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सहायता केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नारायण मुनघाटे, नितेश गेडाम, तुळशीराम शिलेदार उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला वाॅर्डातील नागरिक उपस्थित हाेते.
फुले वाॅर्डात ५० युवकांचे रक्तदान
गडचिराेली : नगरसेविका माधुरी खाेब्रागडे, अमाेल खाेब्रागडे, निखिल वाकडे यांच्या नेतृत्वात शहरातील फुले वाॅर्डात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ५० युवकांनी रक्तदान केले. यावेळी विशाल बारसिंगे, वैभव बारसिंगे, शुभम दामले, करण दुर्गे, निखिल बांबाेळे, कालू खेवले, मुकुंद खाेब्रागडे, राकेश डाेंगरे, राजू बांबाेळे, नरेश वाकडे, स्नेहल मेश्राम, निखिल खाेब्रागडे, गाेलू मेश्राम, धम्मा वंजारी, संघा वंजारी यांनी रक्तदान केले. यावेळी पाेलीस पाटील अनिल खेवले, नगरसेवक प्रशांत खाेब्रागडे, राजू बाेरकर उपस्थित हाेते. रक्त संकलन करण्यासाठी डाॅ. श्रुंखला डाेंगरे यांची चमू हजर हाेती. कार्यक्रमासाठी प्रतीक खाेब्रागडे, संताेष खाेब्रागडे यांनी सहकार्य केले.