क्रांतिज्याेती सावित्रीबाईंना जयंतीनिमित्त जिल्हाभरात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:57+5:302021-01-08T05:56:57+5:30
औद्याेगिक प्रशिक्षण संस्था, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्यावतीने घेण्यात ...
औद्याेगिक प्रशिक्षण संस्था, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य संताेष साळुंके यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संचालन भास्कर मेश्राम यांनी केले. यावेळी गटनिदेशक व कर्मचारी उपस्थित हाेते.
प्रज्ञा संस्कार काॅन्व्हेंट, गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने एकपात्री प्रयाेग, कविता वाचन, मनाेगत आदी उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सविता गाेविंदवार, उपमुख्याध्यापक चेतन गाेरे, रिजवाना पठाण, जयश्री मुळे उपस्थित हाेते.
मानापूर/देलनवाडी : दवंडी येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी पं. स. सभापती बग्गुजी ताडाम, हिराजन कुमरे, सिगुजी ताडाम, ऋषी कुमरे, वासुदेव निकुरे, दादाजी पेंदाम, वर्षा निकुरे उपस्थित हाेते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले, मुंडा यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
जारावंडी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला श्रीहरी माेहुर्ले, धनराज गुरनुले, तुळशीराम गुरनुले, शंकर चाैधरी, महेश माेहुर्ले, सुरेश वाढई, चंद्रभान माेहुर्ले, प्रकाश गुरनुले उपस्थित हाेते.
महिला काॅंग्रेस गडचिराेली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी हाेत असल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला महिला काॅंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, उपाध्यक्ष पाैर्णिमा भडके, शहर अध्यक्ष संघमित्रा राजवाडे, सुमेन उंदीरवाडे, शशिकला सहारे, अहिल्या सहारे, सुषमा भडके, नैना नंदनवार, निर्मला टेभुर्णे, कविता बोरकर, लीना उंदीरवाडे, शालिनी शेंडे व महिला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्या उपस्थित हाेत्या.
काैसल्या निवासी मतिमंद विद्यालय बाेदली : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत जोशी, विशेष शिक्षक उमेश देशमुख, तनुजा मोहिते, राजू भोमले, वीणा बोधनकर, प्रमोद चिल्वरवार, अंजना शिंदे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तनुजा मोहिते यांनी केले.
प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कनेरी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नार्लावार हाेते. प्रमुख अतिथी म्हणून डी. एस. गडपल्लीवार, के. आर. पिल्लारे उपस्थित हाेते. मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आर.ए. बैस तर आभार शरद गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्काॅलर्स आरमाेरी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य नितीन कासार, रविकांत म्हस्के यांच्यासह शिक्षक उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
बुद्धविहार महागाव : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सावित्री महिला मंडळाच्या अध्यक्ष रसिका भाेगले हाेत्या. यावेळी गीता वाघाडे, नारायण अलाेणे व महिला उपस्थित हाेत्या. उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले.
गडचिराेली : मुरखळा येथे माळी समाज संघटनेच्यावतीने क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रा. सुरेश लाेनबले, ॲड. भाेजराज वसाके, बाबुराव शेंडे, प्रा. वामन राऊत, सुनील कावळे, नंदाजी रायसिडाम, देवराव बुरे, प्रदीप चाैधरी, विजय जाम्पलवार, भय्याजी निकुरे, बाळकृष्ण साेनुले, आशिष बाेरवार, सिद्धार्थ शेंडे, आशिष मेश्राम, आकाश पाटील, कविता आदे, कृष्णा निकुरे, अविनाश वाटगुरे, सुभाष माेहुर्ले, अरूण वाटगुरे, दिलीप शेंडे, रंजना गुरनुले, वंदना शेंडे, पल्लवी साेनुले, संगीता गुरनुले, तुकाराम दुधे, वासुदेव रामटेके उपस्थित हाेते. सुरूवातीला गावातून फेरी काढण्यात आली. यावेळी फलकाच्या माध्यमातून महिला शिक्षणाचा संदेश देण्यात आला. दरम्यान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संचालन सचिन माेहुर्ले, प्रास्ताविक हिमांशू बुरे तर आभार धनराज वाढई यांनी मानले. यशस्वीतेसाठी धनराज माेहुर्ले, महादेव वाटगुरे, माराेती मांदाळे, प्रकाश शेंडे, लुटारू रस्से, जांबूवंत लेनगुरे, ज्याेत्स्ना गुरनुले, रूचिता निकुरे, राकेश साेनुले, विपीन शेंडे, गंगाधर शेंडे, गाेपाळा रस्से, मंगेश शेंडे, बंडू माेहुर्ले, दिनाजी शेंडे, येनाजी गुरनुले, दिवाकर गुरनुले यांनी सहकार्य केले.
आमगाव महाल : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी जितेंद्र माेहुर्ले हाेते. यावेळी बबनराव कावळे, सीताराम गावतुरे, तुळशीराम भेंडारे, लक्ष्मण साेनुले, नारायण गुरनुले, रवी माेहुर्ले उपस्थित हाेते. गावात शाेभायात्रा काढण्यात आली. प्रास्ताविक भूषण माेहुर्ले यांनी केले.
जि. प. कन्या शाळा, चाेप : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विठ्ठल दहीकर हाेते. यावेळी विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारूनमी सावित्री बाेलतेय या स्पर्धेत सहभागी झाल्या. यात प्रथम क्रमांक अवनी बनपूरकर, द्वितीय क्रमांक मानसी इंदूरकर हिने पटकाविला. यावेळी रूपाली कुथे, छाया कुथे यांनी मनाेगत व्यक्त केले. यावेळी विजेत्यांना पारिताेषिक देऊन गाैरव करण्यात आला. संचालन सुरेखा बन्साेड तर आभार प्रगती धाईत हिने मानले.
आदिवासी गाेंडवाना गाेटूल समिती, मुरखळा : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले व जयपालसिंग मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी रामराव काेवे हाेते. यावेळी मालता पुडाे, भरत येरमे, जयश्री येरमे, गिरीष तुमराम, सचिन भलावी, तुकाराम तलांडे, शनि कन्नाके, इंदरशहा काेकाेडे, राम नराेटे, हिवराज आत्राम, तुकाराम तलांडे, साईनाथ पुंगाटी, गंगाधर गेडाम, नवसू पदा, नामदेव आलाम, राजकुमार कन्नाके, पीयाराम शेडमाके, निशांत कुळमेथे, अनुराग ताेडासे, जयश्री येरमे, वीणा उईके, सविता कुळमेथे, रंजना नराेटे, प्रतीभा पुंगाटी, वर्षा कुळमेथे, सपना भुरकुरे, गीता नैताम, सविता गाेटा, आशा पदा, निर्मला भलावी उपस्थित हाेते. उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करून विचार व्यक्त केले. संचालन सचिन भलावी तर आभार गिरीष तुमराम यांनी मानले. यशस्वीतेसाठी साईनाथ पुंगाटी, शनि कन्नाके, गंगाधर गेडाम, अक्षय आत्राम, वीणा उईके, लता हारामी यांनी सहकार्य केले.
देसाईगंज : फवारा चाैकातील आर्यसत्य बुद्धविहारात क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला वासुदेव धकाते, शंकर बेदरे, डाकराम वाघमारे, दीपक पिल्लेवान, श्यामराव रामटेके, जगदीश तामगाडगे, संताेष बहादुरे, नामदेव मेश्राम, सूरज लिंगायत उपस्थित हाेते.
स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सी. एस.राऊत, जे. एस. जिचकार कर्मचारी उपस्थित हाेते.
आदर्श इंग्लिश हायसकूल, देसाईगंज : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य सुलभा प्रधान, धमेंद्र तागडे, उपमुख्याध्यापक प्रा. सदाराम ठाकरे, पर्यवेक्षक जे. डी. नाकताेडे उपस्थित हाेते. सावित्रीबाई फुले केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहेत, असे प्रतिपादन सुलभा प्रधान यांनी केले. संचालन दीपाली राठाेड यांनी केले.
श्री सद्गुरु साईबाबा महाविद्यालय आष्टी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डाॅ. पंकज चव्हाण हाेते. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. रमेश साेनटक्के, प्रा. सुबाेध साखरे, कर्मचारी अरविंद थुटे, संदीप मानपुरे, रवींद्र झाडे, शुभांगी डाेंगरे, रमेश वागधरकर, देवीदास किवे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
रांगी : निमगाव येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला बाैद्ध समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष गुणवंत खाेब्रागडे, सचिव दिलीप बारसागडे, सुलाेचना मेश्राम, श्रद्धा मेश्राम, शीला वाळके, प्रीती नगराळे, गाेपी खाेब्रागडे, शुभांगी बारसागडे, आनंदराव बरडे, आकाश मेश्राम, नरेश वाळके, लाेकमित्र बारसागडे, जाेतिबा बांबाेळे, मिथून मेश्राम उपस्थित हाेते. रिमा बारसागडे तर आभार गयाबाई खाेब्रागडे यांनी मानले.
जा. कृ. बाेमनवार विद्यालय चामाेर्शी : येथे क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य महेश तुपल्लीवार,पर्यवेक्षक आय. जी. चांदेकर, एन. डब्ल्यू. कापगते व कर्मचारी उपस्थित हाेते.