हलबा समाजातर्फे शहीद गैदसिंग यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:23+5:302021-01-23T04:37:23+5:30
मुरूमगाव : धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवार २० जानेवारीला अखिल भारतीय हलबा-हलबी समाज संघटनेतर्फे शहीद शिराेमणी गैदसिंग शहीद दिन ...
मुरूमगाव : धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव येथे बुधवार २० जानेवारीला अखिल भारतीय हलबा-हलबी समाज संघटनेतर्फे शहीद शिराेमणी गैदसिंग शहीद दिन समारंभ पार पडला. या कार्यक्रमात समाजबांधवांनी गैदसिंग यांना अभिवादन केले.शहिद दिनानिमित्त सकाळी महिलांनी गावातून कलश यात्रा काढली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मणिराम रावटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अजमन रावटे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य लता पुंगाटे, जि. प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, जयराम मार्गीया, रामलाल मार्गीया, बैसाकुराम काेटपरिया, महारसिंग फरेबिया, बाेदीराम भैसारा, कीर्तन भाेयर, ग्रामसेवक नारायण आखाडे, इकताई मडकाम, कचरू पटेल, माे. शरीफ कुरेशी उपस्थित हाेते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. समाजातील समस्या साेडविण्यासाठी सर्वांनी एकजुट व्हावे, तसेच सहकार्याची भावना ठेवावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक सरादू चिराम, संचालन सवलसिंग राऊत तर आभार साेनसंगी धनगुन यांनी मानले. कार्यक्रमाला मुरूमगाव, खेडेगाव, पन्नेमारा, कुलभट्टी, बेलगाव, सावरगाव, रिडवाही, आमपायली, तुमरीकसा येथील शेकडाे नागरिक उपस्थित हाेते. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.