कृषी योजनेतून उन्नती साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:02 PM2019-03-13T23:02:42+5:302019-03-13T23:03:00+5:30

कृषी विभागाच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असा सूर मान्यवरांनी काढला. उपपोलीस स्टेशन पेरमिलीच्या वतीने सोमवारी जनजागरण व कृषी विकास मेळावा घेण्यात आला.

Grow Up from Agriculture Scheme | कृषी योजनेतून उन्नती साधा

कृषी योजनेतून उन्नती साधा

Next
ठळक मुद्देपेरमिलीत जनजागरण मेळावा : उपपोलीस स्टेशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : कृषी विभागाच्या वतीने विविध जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असा सूर मान्यवरांनी काढला. उपपोलीस स्टेशन पेरमिलीच्या वतीने सोमवारी जनजागरण व कृषी विकास मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विकास अधिकारी एस.जे.धनवटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफ बटालियनचे अधिकारी एस.एस.रावत, आसिफ पठाण, कृषी सहायक व्ही.एस.डोंगरे, कृषीसेवक मनोज कन्नाके, महारू तलांडी, कारे आत्राम, बापूजी सडमेक, वाघाजी आत्राम उपस्थित होते. याप्रसंगी कृषी अधिकारी एस.जे.धनवटे यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी प्रामुख्याने भाजीपाला लागवड, मिरची लागवड, कांदा लागवड, लसून लागवड यासह विविध पिकांबाबत माहिती दिली.
पेरमिलीचे प्रभारी अधिकारी स्वत: कृषी पदवीधारक असल्याने पोलीस स्टेशनच्या आवारात मिरची, कांदा, लसून, हळद लागवड केली आहे. त्यांनी याबाबत नागरिकांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन राकेश उरवते तर आभार सुनील तोरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पीएसआय महेश मतकर, प्रदीप गायकवाड, पंकज सपकाळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला चंद्रा आलदंडी, पेरमिली, कोरेली, पल्ले, आरेंदा, येरमनार, तुमरीकसा, कासमपल्ली, गुर्जा, ताडगुडा, चौडमपल्ली येथील नागरिक हजर होत.
शेतकऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान पेरमिली परिसरातील बापूजी सडमेक, कारे आत्राम, लक्ष्मण कुळमेथे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी धानपिकासोबतच नगदी पिके घेण्याकडे वळावे, यासाठी कृषी विभागातर्फे परिसरातील २० शेतकºयांना मका बियांचे वाटप करण्यात आले. तसेच शेतकºयांना मका लागवडीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

Web Title: Grow Up from Agriculture Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.